शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव कॅनॉलला पाण्याची आस

By admin | Updated: January 17, 2017 23:39 IST

बाळद ता.पाचोरा : वडगाव कॅनॉलमध्ये गिरणा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली

बाळद ता.पाचोरा : वडगाव  कॅनॉलमध्ये  गिरणा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली असून लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लवकर पुरेसे पाणी न मिळाल्यास केळीच्या पिकास काही प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.हा परिसर बागायती म्हणून ओळखला जातो. परिसरातील मुख्य पीक म्हणजे केळी हे आहे. इतर पिकांपेक्षा या पिकाला जादा पाणी लागते. बाळद शिवारात  मोठे धरण व पाट नाही. यामुळे भविष्यात शेतीसाठीचे पाणी तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात उद्भवू शकतो. यंदा वरुणराजा चांगला बरसला. परंतु पावसाचे पाणी वाहून गेले. पाण्याअभावी अनेक शेतकºयांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. माजी आमदार आर.ओ.पाटील व जि.प. माजी उपाध्यक्ष प्रकाश सोमवंशी यांनी े वडगाव कॅनॉलची दुरुस्ती करुन दोन-तीन वर्षे गिरणा धरणाचे पाणी या कॅनॉलला सोडून  १५ गावांना या पाण्याचा पाटचाºयांद्वारे लाभ झाला होता. गिरणा धरणातील पाणी साठ्यापैकी ८ टक्के पाणी हे वडगाव कॅनॉलसाठी राखीव असल्याने हे पाणी या कॅनॉलमध्ये सोडल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल आणि परिसरातील विहिरींच्या जलपातळीतही वाढ होईल. परिसरात केळी, मका, ज्वारी, बाजरी या रब्बी पिकाचा पेरा सर्वाधिक आहे. हे पीक पाण्याशिवाय हिरावले जावू नये यासाठी गिरणा धरणाचे पाणी वडगाव कॅनॉलमध्ये सोडावे अशी मागणी  शेतकºयांनी केली आहे. (वार्ताहर)वडगाव कॅनॉल हा ब्रिटीशकालीन  आहे.  या कॅनॉसाठी गिरणा धरणातील साठ्यापैकी ८ टक्के जलसाठा राखीव आहे. हे पाणी या कॅनालमध्ये सोडल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटू शकतो पण यासाठी गरज आहे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची.