शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अमृतसरला चंदूची कुटुंबीयांशी भेट

By admin | Updated: January 30, 2017 23:56 IST

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री: कुटूंबीय आनंदाश्रुंनी चिंब, सुभाष भामरे देवदूतच-भूषण चव्हाण

धुळे : नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना भारतात सुखरूप परत आणण्यात आल्यानंतर रविवारी प्रथमच कुटुंबीयांनी त्यांची अमृतसर लष्करी कार्यालयात भेट घेतली़ या भेटीवेळी कुटूंबीय आनंदाश्रूंनी चिंब झाले होत़े केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे हे चव्हाण कुटुंबासाठी देवदूतच आहेत, अशी प्रतिक्रिया चंदू यांचे भाऊ भूषण चव्हाण यांनी व्यक्त केली आह़ेअमृतसर येथे रविवारी सकाळी 9़30 वाजता आजोबा चिंधा धोंडू पाटील, भाऊ भूषण चव्हाण व मेहूणे चेतन पाटील यांनी जवान चंदू चव्हाण यांची भेट घेतली़ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी ही भेट घडवून आणली़ सप्टेंबर महिन्यात भारताने पाकिस्तानवर केलेल्या सजिर्कल स्ट्राईकच्या कालावधित जवान चंदू चव्हाण हे नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानात गेले होत़े त्यामुळे चंदू यांच्या बोरविहीर या गावासह देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होत़े अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी चंदू चव्हाण यांना भारतात सुखरूप परत आणण्यासाठी डॉ़ सुभाष भामरे यांना साकडे घातले होत़े दरम्यान, चंदू भारतात परतल्यापासून कुटुंबीयांनी त्याला भेटण्याची ईच्छा सातत्याने व्यक्त केली होती़ त्यानुसार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी ही भेट घडवून आणली़ चंदूला पाहून आम्ही सर्वच खूप भावनिक झालो होतो असे चंदूचे भाऊ भूषण चव्हाण म्हणाल़े  चंदू यांची सैन्याचे अधिकारी व डॉक्टरांकडून योग्य पध्दतीने काळजी घेण्यात येत आह़े चंदू पाकिस्तानात गेल्याचे समोर आल्यापासून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी परिवारासोबत सतत संपर्क ठेवला होता, तसेच त्यांनी कुटुंबीयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, विदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी भेट घालून दिली होती़ चंदू लवकरच घरी येईल असा विश्वास असल्याचेही कुटुंबीयांनी स्पष्ट केले असून डॉ़ भामरे हे चव्हाण कुटुंबीयांसाठी देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली़