शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्याने ग्रामस्थ त्रस्त

By admin | Updated: April 6, 2017 00:46 IST

आरोग्य धोक्यात : कर्णफाटावासीयांचे हाल थांबेना, प्रशासनाचे दुर्लक्ष, जनता संतप्त

जामनेर : ‘पिण्याचे पाणी द्या’, अशी मागणी करीत जलसंपदामंत्र्यांच्या घरावर रिकाम्या घागरी घेऊन आलेल्या महिलांना वाकडी ग्रामपंचायतीने पुरविलेले पाणी अत्यंत दूषित असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्याची तक्रार पंचायत समिती कार्यालयापर्यंत पोहोचवूनदेखील कुणीही अधिकारी वा पदाधिकारी गावापर्यंत न पोहोचल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.गेल्या रविवारी कर्णफाटा येथील महिला पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी रिकामे हंडे घेऊन मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी धडकल्यानंतर त्यांनी तातडीने नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे यांना गावात पाठविले. यानंतर वाकडी ग्रामपंचायतीने वाकडी धरणावरून कर्णफाट्यासाठी पाणी सोडले. हे पाणी ज्या टाकीत सोडले गेले तीच मुळात गळकी आहे.वाकडी ग्रामपंचायतीने धरणाजवळील विहिरीचा उपसा करण्यासाठी ते पाणी पाईपलाईनने पाण्याच्या टाकीत व गावाजवळ असलेल्या जुन्या विहिरीत सोडले. उपसा होत असलेले दूषित पाणी पाण्याच्या टाकीत सोडले गेल्याने हेच पाणी ग्रामस्थांना प्यावे लागले. त्यामुळे गावातील महिला, लहान मुलांना वांत्या व जुलाबाचा त्रास व्हायला लागला. ही माहिती कर्णफाटा गावातील रवींद्र माने यांनी बुधवारी गटविकास अधिकाºयांना दिली.एकीकडे अशी बिकट परिस्थिती असताना वाकडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सांगतात की, सोडलेले पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांनी ते वापरू नये, अशी दवंडी दिली.मंत्र्यांच्या निवासस्थानी पिण्याचे पाणी मागण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याऐवजी ग्रामपंचायतीने विहिरीचा उपसा करून ते दूषित पाणी टाकीत सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळच चालविला. याउपरही ग्रामसेवक म्हणतात, आम्ही गुरुवारी गावास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करू. ग्रामसेवकांच्या या भूमिकेवरही ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)वाकडी व कर्णफाटा गावांना तोंडापूर धरणातून जलवाहिनीने पाणीपुरवठा करण्यासाठी आजपर्यंत तीन योजना राबविल्या गेल्या. कोट्यवधीचा खर्च झाला. मात्र कर्णफाटा येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. कर्णफाटा गाव वाकडी ग्रुप ग्रामपंचायतीशी जोडलेले असून सरपंचांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. दरम्यान, सरपंचांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. सुमारे ४०० लोकसंख्येच्या कर्णफाटा गावासाठी एकात्मिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत बांधण्यात आलेली ही पाण्याची टाकी. मात्र ती बांधकाम झाल्यापासून कोरडीच आहे. ग्रामस्थांच्या दृष्टीने ही टाकी केवळ ‘शोपीस’सारखी ठरत आहे.मंत्र्यांकडे पाणी मागण्यासाठी गेल्यानंतर जे पाणी प्यायला मिळाले ते अत्यंत दूषित असल्याने त्वचेचे आजार झाले. आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की, आम्हाला काही नको, फक्त प्यायला शुद्ध पाणी द्या.-सिंधूबाई पाटील, ग्रामस्थ, कर्णफाटा.वाकडी ग्रामपंचायतीने पिण्यासाठी सोडलेल्या दूषित पाण्यामुळे वांत्या व जुलाबाचा त्रास झाला. चार दिवस उलटले तरी गावकºयांना पिण्याचे पाणी मिळू शकले नाही. आम्हाला काही नाही मिळाले तरी चालेल; पण प्यायला पाणी द्या.-शांताबाई माने, ग्रामस्थ, कर्णफाटा.कर्णफाटा येथील राष्टÑीय पेयजल योजनेचे काम अपूर्ण आहे. वाकडीपर्यंत काम पूर्ण झाले असून येत्या १५ दिवसात कर्णफाट्यापर्यंतचे काम पूर्ण केले जाईल.-एम.जी.सराफ,उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, जि.प. जळगाव.