शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

आमदारांच्या दत्तक गावात पाण्याअभावी ग्रामस्थ जेरीस

By admin | Updated: April 11, 2017 00:50 IST

उमाळेकरांना विकास कामांची प्रतीक्षामनपाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पावरून पाण्यासाठी ग्रा.पं.च्या पत्राला केराची टोपली

चंद्रकांत जाधव   जळगावशहरापासून फक्त 12 किलो मीटर अंतरावर असलेल्या उमाळे गावाला आमदार सुरेश भोळे यांनी शासनाच्या आदर्श ग्राम योजनेतून दत्तक घेतले आहे. पण हायमास्टपलीकडे आमदार निधीतून अजून कुठलीही कामे झालेली नाहीत. गावाची लोकसंख्या सहा हजारांवर आहे. चार प्रभाग असून, ग्रामस्थांना पुरेसे व शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेअभावी हाल सहन करावे लागत आहेत. ग्राम पंचायतीने पत्रव्यवहार करून महा पालिकेच्या उमाळे शिवारातील जल शुद्धीकरण प्रकल्पावरून पाणी मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला, पण या गावाला औद्योगिक दराने पाणी देऊ, अन्यथा नाही, अशी            पालिकेने आडकाठी घातली आहे. लालफितशाही,             सत्तेच्या राजकारणातून ग्रामस्थांचा त्रास  न           वाढविता मार्ग काढावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. आदर्श ग्राम योजनेतून अजून कामांना सुरुवात नाहीआमदार सुरेश भोळे यांनी उमाळे गाव आदर्श ग्राम योजनेतून दत्तक घेतले आहे. अजून या योजनेतून एकही काम झालेले नाही. कामांचा कृती आराखडा सादर केला आहे. 10 लाख रुपये ग्रा.पं.च्या स्वतंत्र खात्यात जमा झाले आहे. त्यातून लवकरच कामे सुरू करू. या योजनेसंबंधीच्या कामांना तांत्रिक                मुद्दय़ांमुळे उशीर झाला, पंचायत किंवा कुण्या पदाधिका:याची यात चूक नसल्याचेही स्पष्टीकरण ग्रा.पं.ने दिले. मनपाची औद्योगिक दरात पाणीपुरवठय़ाची अटमहापालिकेच्या वाघूर प्रकल्पावरून आलेल्या जलवाहिनीचे शुद्धीकरण केंद्र उमाळे शिवारात आहे. या केंद्राद्वारे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्रा.पं.ने पालिकेस पत्र दिले, पण गावास औद्योगिक दराने पाणी देऊ. त्याचे दर एक हजार लीटरमागे 21 रुपये, असे असतील.. असा खुलासा पालिकेने केला आहे. त्यावर हे केंद्र उमाळे शिवारात असताना त्याचा कुठलाही ग्रा.पं.कर पालिकने भरलेला नाही. आठ वर्षात जवळपास आठ लाख रुपये कर थकल्याने या केंद्राला सील करू, अशी भूमिका ग्रा.पं.ने घेतल्याचे काही पदाधिकारी म्हणाले. शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी वाहून नेणा:या नाल्यावरील विहिरीद्वारे गावात पाणीउमाळे येथे शासकीय योजना पिण्याचे पाणी देण्यास असमर्थ ठरली आहे. सध्या गावाला जलशुद्धीकरण प्रकल्पावरून प्रक्रियेनंतर बाहेर पडणा:या पाण्याच्या नाल्यानजीक खोदलेल्या विहिरीतून पाणी मिळते. हा नाला सतत वाहता असतो.. त्याच्या आजूबाजूच्या शेतांमधील विहिरांना ब:यापैकी पाणी आहे..ग्रा.पं.ला पाणीपुरवठा करणारी ही विहिर खाजगी आहे. पण पाणी पुरेसे यायला हवे, गावासाठी स्वमालकीची स्वतंत्र यंत्रणा हवी, असे ग्रामस्थांनी सांगितले. महादेव मंदिरात सभागृह, कुंपणाची गरजउमाळे येथील महादेवाच्या मंदिरात श्रावणात भक्तगण मोठय़ा संख्येने येतात.. त्यात तत्कालीन जि.प.सदस्य गोपाळ देवकरांच्या सहकार्याने भक्तनिवास, स्वच्छतागृह आदी कामे झाली.. तसेच लोकसहभाग, मदतीने मंदिराचे सुशोभिकरण, कूपनलिका आदी कामे घेतली.. आता सभागृह, कुंपण आदी कामे व्हायला हवीत, असे मंदिराची पाहणी केली असता जाणवले. 12 लाखांची तात्पुरती योजनाही पाण्यातगावातील पाणीपुरवठय़ासाठी मागील काळात 12 लाखांची तात्पुरती पाणी योजना हाती घेतली. कंडारी शिवारातील विहिरीतून त्यासाठी पाणी आणायचे होते. पण विहिरीला पुरेसे पाणीच नसल्याने ही योजनाही गुंडाळली गेली. हायमास्ट उभारतानाही राजकारणमध्यंतरी आमदार सुरेश भोळे यांच्या सूचनेनुसार गावात तीन हायमास्ट आले, पण ते गावातील             भाजपा कार्यकत्र्याच्या सूचनेनुसार उभारले जावेत, अशा सूचना होत्या. ग्रा.पं. पदाधिका:यांना विचारले नाही.. विकास करायचा असेल तर सर्वाना सोबत घ्यावे.., असे काही ग्रामस्थ म्हणाले. प्रभाग क्र.1 मध्ये सांडपाण्याच्या व्यवस्थेचा अभावप्रभाग क्र.1 व देव्हारीकडे जाणा:या रस्त्याकडील भागात सांडपाण्याचे पक्के मार्ग तयार करण्याची गरज असल्याचे दिसून आले. सांडपाणी रस्त्यावरून पुढे थेट खुल्या भूखंडाकडे जात होते. तर काही गटारीही तुंबल्या होत्या. लोकसहभागातून गावहाळतांडा भागात अलीकडेच गावहाळ तयार केला आहे. त्याचा पशुधनाला पिण्याच्या पाण्यासाठी लाभ होत आहे. असेच दोन गावहाळ तयार होत आहेत. त्यातील एक हाळ वनविभागाने तयार केला आहे.