शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - जळगाव जिल्ह्यातील ५१० बार बंद

By admin | Updated: April 1, 2017 17:04 IST

ऑनलाइन लोकमत  जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग व राज्य मार्गावरील परमीट रुम व बियर बारला ३१ मार्चनंतर परवानगी नाकारल्याने ...

ऑनलाइन लोकमत जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग व राज्य मार्गावरील परमीट रुम व बियर बारला ३१ मार्चनंतर परवानगी नाकारल्याने जळगाव जिल्ह्यातील ५१० बार १ एप्रिलपासून बंद झाले. याची आजपासून अंमलबजाणी करीत बारमालकांनी स्वत:हून हॉटेल्स, बार बंद ठेवले. काही ठिकाणी हॉटेल सुरू होत्या. ५१० बार बंद होणार असल्याने जिल्ह्यात १२ कोटीच्या महसूलावर राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाणी सोडावे लागले. दरम्यान, बारमालकांना अभय देण्यासाठी जळगावातून जाणारे सहा राज्य मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेकडे वर्ग केले आहे. 

महामार्ग व राज्य मार्गावर ५०० मीटरच्या आत असलेले सर्व दारुचे दुकाने, हॉटेल, परमीट रुम व बार यांना १ एप्रिल २०१७ पासून बंदी घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यापूर्वीच दिले होते. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील बारचे अंतर मोजले असता महामार्ग व राज्य मार्गला लागून १०० मीटरच्या अंतरावर २२१ तर ५०० मीटरच्या आत २८९ असे एकूण ५१० बार असल्याचे निष्पन्न झाले. 

जिल्ह्यातील २३४ बार सुरक्षित दरम्यान, जिल्ह्यात एकुण ७४४ बार आहेत. त्यातील ५१० बार व हॉटेलला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा फटका बसला आहे. त्यामुळे २३४ बार या नियमानुसार सुरक्षित आहे. 

जिल्ह्यात १६ कोटीचा महसूलजिल्ह्यात २०१५-१६ या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाला १५ कोटी ८६ लाखाचा महसूल मिळाला होता. यंदा मात्र आठ कोटीचा फटका बसला आहे. मार्चअखेर ५ कोटीचा महसूल मिळणे अपेक्षित होते, मात्र नूतनीकरण थांबल्याने हा महसूल बुडाला आहे. आगामी वर्षात तर यापेक्षाही मोठा फटका बसेल. साधारण १२ कोटी रुपयांचा महसूल बुडण्याचा अंदाज आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच ५१० बार मालकांना यापूर्वीच नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.तरीही आता पुन्हा बंदच्या नोटीसा बजावण्यात येतील. या बारचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. बार सुरु आढळल्यास कारवाई केली जाईल.-एस.एल.आढाव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क दारु दुकान मालकांच्या अभायासाठी सहा राज्य मार्ग महापालिकेकडेजळगाव : राष्ट्रीय व राज्य मार्गाला लागून असलेल्या दारुदुकानासोबतच बार, रेस्टारंट बंद करण्याच्या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील दारुदुकाने वाचविण्यासाठी सहा राज्य मार्ग जळगाव महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. 

या रस्त्यांचा समावेश

चोपडा-भोकर-आमोदा-जळगाव-पाचोरा-वाडी-सातगाव रस्ता राज्य मार्ग क्र.४० (म्हणजेच शिरसोली रस्ता) ४८/०० ते ५१/०० असे ३ किमी व ४६/२० ते ४७/०० असे ०.८० किमी, पहूर-जळगाव इंदूर रस्ता (रा.मा.क्र.४२)- ५.५० किमी, बांभोरी-निमखेडी-जळगाव- असोदा-भादली (प्रजिमा-५९)- १.५० किमी, बांभोरी-निमखेडी-जळगाव-असोदा-भादली (प्रजिमा-५९)- ६.५० किमी, जळगाव कलेक्टोरेट रस्ता (प्रजिमा-५४)-३.२२ किमी असे २०.५२ किमीचे ६ रस्ते या शासन निर्णयानुसार अवर्गीकृत घोषित करण्यात आले आहेत.काय आहे शासन निर्णयसार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ मार्च २०१७ रोजी काढलेल्या या शासन निर्णयात म्हटले आहे की, जळगाव मनपाकडे देखभाल व दुरुस्तीसाठी वर्ग/हस्तांतरीत केलेले एकूण ६ रस्ते अवर्गीकृत करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक विभाग, नाशिक यांनी सादर केलेला आहे. त्या प्रस्तावातील रस्ते ६ मार्च २००२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्कालीन जळगाव नपाकडे सुधारणा, दुरुस्ती व देखभालीसाठी वर्ग करण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने मनपाकडे वर्ग केलेले एकूण ६रस्ते अवर्गीकृत करण्यात येत असून या रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्च मनपाला करावा लागेल. त्यासाठी शासनाकडून कोणतेही अतिरिक्त अनुदान देण्यात येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

https://www.dailymotion.com/video/x844ux4