शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

फी न घेता डॉक्टरांनी वाचविले तरुणीचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:18 IST

कौतुक : डॉ. सुनील राजपूत यांची माणुसकी

चाळीसगाव : उष्माघाताने बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थिनीवर तातडीने व मोफत औषधोपचार करून शहरातील डॉ.सुनील राजपूत यांनी या विद्यार्थिनीचे प्राण वाचविले. याबद्दल मान्यवरांनी त्यांचा सत्कारही केला.नुकतीच ही घटना घडली होती. मांदुर्णे येथील रहिवाशी व चाळीसगावच्या आर्टस, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजची १२ वीची विद्यार्थिनी हर्षदा प्रताप पाटील ही लक्ष्मीनगर येथे क्लास करीता आली असता अचानक ती खाली कोसळली. यावेळी प्रा. अश्विनी वानखेडकर यांनी प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला, व विद्यार्थ्यांच्या मदतीने तात्काळ डॉ. सुनील राजपूत यांच्या दवाखान्यात आणले. डॉ. राजपूत यांनी क्षणाचा विलंब न लावता लगेच उपचार सुरू केलेत. मात्र मेडिकल वरून औषधी आणायलाही कोणाकडे पैसे नव्हते, त्यावेळी डॉ. राजपूत यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वत: कडून औषध उपचार केलेत. दोन तासांनी विद्यार्थिनी शुद्धीवर आली. डॉक्टरांनी पैसे न पाहता मुलीवर उपचार केल्यानेच तिचे प्राण वाचले. सर्व विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. तर यापुढेही गरजवंतांना आमच्या राजपूत मित्र मंडळाच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.हर्षदा हिने डॉ. राजपूत यांचे आभार मानले. दरम्यान यावेळी जेष्ठ नागरिक प्रीतमदास रावलानी हे देखील येथे उपस्थित होते. त्यांनीही डॉक्टर राजपूत यांचे अभिनंदन केले. यावेळी मंडळाचे सदस्य डॉ. संतोष मालपुरे, व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित होते.