शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

प्राचार्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणावर कुलगुरु म्हणतात... तडजोड करुन प्रकरण मिटवून टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:10 IST

सल्ला देणे दुर्देबी बाब- पियुष पाटील यांचा आरोप

जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ एल़पी़देशमुख यांनी केलेल्या भष्ट्राचाराबाबत पाच महिन्यात २८ वेळा तक्रारी केल्या़़, ३ वेळा स्मरणपत्रे दिले़़़, २ वेळा आंदोलनाचा इशारा दिला़़़पण या तक्रारींची साधी दखल विद्यापीठ प्रशासनाकडून घेण्यात आली नाही़़ या प्रकरणावर कुलगुरूंची भेट घेतली़ त्यावेळी त्यांनी तडजोड करून प्रकरण मिटविण्याचा अजब सल्ला आम्हाला दिला, असा आरोप तक्रारदार पियुष नरेंद्र पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.दरम्यान, डॉ़ एल़पी़ देशमुख यांनी माझ्याविरूध्द जाहीर पत्रकार परिषद घेऊन बदनामीचा कट रचला़ माझ्यावर बेछूट आरोपही केले, असे करून त्यांनी विद्यापीठ कायद्याची पायमल्ली केली असल्याचेही त्यांनी सांगितले़पाच महिन्यात २८ तक्रारीडॉ़ देशमुख यांनी टी़सी़ प्रकरणात केलेल्या भ्रष्ट्रचाराची चौकशी होवून आॅडीट व्हावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीबाबत २८ तक्रारी विद्यापीठात केल्या आहेत़ ३ स्मरणपत्रे देण्यात आली आहेत़ दहा ते पंधरावेळ कुलगुरूंची भेट घेण्यात आली आहे़ परंतु, तक्रारींची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही, असे पियुष पाटील म्हणाले़पाच दिवसात हकालपट्टी न केल्यास आंदोलनप्राचार्य पद तसेच एम़सी़मेंबर पदावरून डॉ. देशमुख यांची हकालपट्टी न केल्यास विद्यापीठासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.भेटण्यासाठी गेल्यावर कुलगुरुंनी काय सांगितले....तुझी नेमकी प्राचार्य देशमुख यांच्याबद्दल वैयक्तिक काय नाराजी आहे़ त्यांना आणि मला तुझ्या सहकार्याची अपेक्षा आहे़ प्राचार्यांनी हा निरोप माझ्याजवळ दिला आहे़ तु तयार असशील तर आपण मिटींग लावू व तू केलेल्या आरोपांबाबत सांगतीश तशी तडजोड मी स्वत: मध्यस्थी राहून करून देईल़ तसेच तू राबवित असलेले रक्तदानाच्या उपक्रमाबाबत प्राचार्य कौतुक करतात, असेही त्यांनी सांगितले़पण ते खुलासा देईना !अनधिकृतपणे महाविद्यालय बंद केल्याप्रकरणी व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहसंचालक कार्यालयाकडे तक्रार केली होती़ तक्रारीची दखल घेवून सहसंचालक कार्यालयाकडून खुलासा सादर करण्याबाबत डॉ़देशमुख यांना दोन वेळेस नोटीस बजावण्यात आल्या़ मात्र, अजूनही त्यांनी खुलासा सादर केलेला नाही. सहसंचालक कार्यालयातील राम राठोड हे स्वत: आता जबाब नोंदविण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़या प्रकरणाबाबत डॉ़ एल़पी़देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या आरोपांबाबत बोलण्यास असमर्थता दर्शविली़

टॅग्स :Jalgaonजळगाव