महाराष्ट्राची साधू संतांची भूमी आहे. वारी हा वारकरी संप्रदायाचा उपासनेचा व संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. एकीकडे जनजीवन सुरळीत सुरू आहे, लग्न, समारंभ, सरकारी कार्यक्रम सर्रास सुरू आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांची गर्दी होत आहे. मग वारकऱ्यांच्या उपासनेच्या मूलभूत हक्कांवर गदा का आणली जात आहे, लसीकरणामुळे कोरोना नियंत्रणात आहे, त्यामुळे प्रत्येक पालखीच्या किमान तीन चार लोकांना परवानगी द्यावी, मानाच्या प्रत्येक पालखी सोबत ५०० लोकांना परवानगी द्यावी, दोन्ही डोस झालेल्यांना आरटीपीसीआर चाचणी करून परवानगी द्यावी, अशी मागणी विहिपचे शहराध्यक्ष संजय विसपुते, बजरंग दलाचे प्रखंड संयोजक अक्षय कासार, शहर संयोजक मनोज मराठे, प्रखंड गोरक्षा प्रमुख गणेश सोळंकी, सुरक्षा प्रमुख रमाकांत बोरसे, शहर सेवा प्रमुख अनिल बडगुजर, राम चौधरी, सचिन चौधरी, पवन बारी, महेश पाटील यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
170721\17jal_5_17072021_12.jpg
वारींना परवानगी देण्याची विहिप व बजरंग दलाची मागणी