शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

व्हेंटिलेटर उपलब्ध असूनही उपयोगात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 20:52 IST

भुसावळ : माजी आमदार संतोष चौधरी यांनी मांडली आरोग्य मंत्री टोपे यांच्याकडे व्यथा

भुसावळ : साकेगाव जवळील ट्रामा सेंटर येथे कोरोना काळात व्हेंटीलेटर उपलब्ध असतांना सुद्धा गेल्या अनेक महिन्यापासून ते केवळ पडून आहेत. व्हेंटिलेटर अभावी अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी समस्या निर्माण होत असतान येथे व्हेंटीलेटर असूनही त्याचा उपयोग होत नसल्याची व्यथा वजा तक्रार माजी आमदार संतोष चौधरी यांनी मुंबई येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.कोरोना रुग्णांचा आलेख दिवसागणिक उंचावत असून व्हेंटिलेटर अभावी अनेक रुग्णांना खाजगी रुग्णालय तसेच इतर शासकीय रुग्णालयात हलवावे लागत आहे, ट्रामा सेंटर येथे गेल्या काही महिन्यापासून व्हेंटिलेटर उपलब्ध असून सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. याबाबत शहरातील नागरिकांच्या तक्रारी भ्रमणध्वनीद्वारे माजी आमदार संतोष चौधरी यांच्याकडे आल्या होत्या.उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर वापराविना बंद खोलीत धूळखात पडलेले आहे, त्याचा उपयोग महामारीच्या काळात नाही तर कधी करणार? असा प्रश्नही नागरिकांसमोर आहे.हा प्रकार माजी आमदार संतोष चौधरी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. तसेच उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर तातडीने उपयोगात आणावेत यासाठी स्थानिक प्रशासनाला आदेशीत करावे अशी मागणीही चौधरी यांनी केली आहे.चौधरी यांच्या मागणीची दखल घेत आरोग्य मंत्री टोपे यांनी संबंधित विभागाला त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसेच याबाबतची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सुद्धा पाठवण्यात आल्या आहेत.पालिका रुग्णालयात नाहीपीएमची व्यवस्थानाशिक विभागात अ दर्जा प्राप्त असलेल्या येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात मृत्यूदेहाचे विच्छेदन (पीएम) करण्याची व्यवस्था नाही. तसेच डॉ.आंबेडकर कोविड केअर सेंटर येथे रुग्णांसाठी अंघोळीला गरम पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून रुग्णांनी आंघोळ केली नाही. ा अनेक भौतिक सुविधा नसल्याची बाब कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन चौधरी यांनीही आरोग्य मंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून दिली.व्हेंटिलेटर उपलब्ध झालेले आहेत, मात्र वीज पुरवठा खंडित झाला तर एक सेकंदही व्हेंटिलेटरचा उपयोग होत नाही. यासाठी वीज पुरवठा खंडित झाल्यास इन्वर्टर चालण्यासाठी बॅटरी इन्वर्टर असणे आवश्यक होते ते उपलब्ध झालेले नव्हते. येत्या आठवडाभरात व्हेंटिलेटरची सेवा रुग्णांसाठी उपलब्ध केली जाईल.-डॉ.देवर्शी घोशल,वैद्यकीय अधीक्षक ,भुसावळ.