शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

विक्रेत्यांनी पोलिसांना न जुमानता केली झटापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST

बजरंग बोगद्याजवळ विक्रेते - मनपा कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद : दगडफेकीचा प्रयत्न; तणावाची परिस्थिती निर्माण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

बजरंग बोगद्याजवळ विक्रेते - मनपा कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद : दगडफेकीचा प्रयत्न; तणावाची परिस्थिती निर्माण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाला रोखण्यासाठी सकाळी ११ वाजेनंतर सर्वच अत्यावश्यक सेवा बंद करण्‍याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. असे असतानादेखील नियोजित जागेवर न बसता रस्त्यावरच व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांचा मनपाच्या पथकासोबत बुधवारी सकाळी संघर्ष झाला. वाद विकोपाला जाऊन चक्क विक्रेत्यांनी दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनाही न जुमानता विक्रेत्यांनी झटापट केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

कोरोनाचा कहर वाढल्यामुळे आता अत्यावश्यक सेवादेखील सकाळी ७ ते ११ या वेळेत असून, बजरंग बोगद्याजवळील विक्रेत्यांना मानराज पार्कजवळ जागा निश्चित केल्यानंतरही भाजीपाला विक्रेते नवीन जागेवर जाण्यास नकार देत आहेत. त्यातूनच बुधवारी सकाळी विक्रेते व प्रशासनात जोरदार वाद झाला.

आणि विक्रेते ट्रॅक्टरसमोर झाले आडवे

सकाळी ११ वाजेनंतरदेखील काही जणांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. असाच प्रकार बजरंग बोगदा ते पिंप्राळा उड्डाणपुलादरम्यान सुरू आहे. बुधवारी सकाळी ११ वाजेनंतरही भाजीपाला विक्रेते गल्लीबोळात दुकाने लावत असल्याने पथकाने हटकले. यावेळी काही मालदेखील जप्त करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे सर्व विक्रेत्यांनी सामूहिकरीत्या पथकाला विरोध करत घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार वाद झाला. हा प्रकार एवढ्यावर थांबला नाही तर विक्रेत्या महिला व पुरुषांनी थेट पालिकेच्या ट्रॅक्टरसमोर आडवे येत हमरीतुमरी केली, तर काही वेळ ट्रॅक्टर रस्त्यावरच रोखून ठेवले होते.

हातात घेतले दगड

मनपाच्या पथकाकडून भाजीपाला जप्त करण्‍याची कारवाई सुरू असताना अचानक कोणीतरी पथकाच्या दिशेने दगड भिरकावले. यात एका कर्मचाऱ्याच्या हाताला दगडाचा मार लागला तर काही विक्रेत्यांनीदेखील हातात दगड घेतले होते, अशी माहिती मनपाकडून देण्यात आली. विक्रेते पथकाला जुमानत नसल्यामुळे उपायुक्त संतोष वाहुळेदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी एका विक्रेत्याने थेट मनपाच्या ट्रॅक्टरवर चढून कारवाईचा विरोध केला.

शाब्दिक वादनंतर पोलिसांशी केली झटापट

मनपा कर्मचाऱ्यांना विक्रेते जुमानत नसल्यामुळे अखेर जिल्हा पेठ पोलिसांचे पथक तेथे दाखल झाले होते. यावेळी गोंधळ घालणाऱ्या विक्रेत्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजीपाला विक्रेत्यांनी एकत्र येत पोलिसांनाही विरोध सुरू केला. यावेळी तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता पोलीस कर्मचाऱ्यांसोबत शाब्दिक वाद झाल्यानंतर झटापट करण्यात आल्याचे मनपा उपायुक्त यांनी सांगितले.

गुन्हा दाखल

याप्रकरणी रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्‍यात श्याम आनंदचंद भोई (रा.खंडेराव नगर), आकाश शिवाजी गावंडे (रा. रामेश्वर कॉलनी), सागर शिवाजी गावंडे यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. विशेष म्हणजे दंगलीचा गुन्हादेखील त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे तसेच या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांनी दिली.