शहर पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस स्थितीत मिळून आलेल्या मोटारसायकली बऱ्याच वर्षांपासून पाेलीस स्टेशन आवारात पडून आहेत. यातील काही मूळ मालकांना त्यांची वाहने कायदेशीर बाबी पूर्ण करून परत करण्यात आली असून अजूनही ५९ वाहने शिल्लक आहेत.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी पत्रव्यवहार करून जाहीर खुला लिलाव करण्याची अनुमती मिळाली असून, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी ठरवून दिलेल्या किमतीप्रमाणे लिलावाची बोली लावता येणार आहे.
दिनांक १५ रोजी सकाळी १० वाजता चोपडा शहर पोलीस स्टेशन आवारात लिलावाला सुरुवात होणार असून परवानाधारक भंगार विक्रेते यात सहभागी होऊ शकतात, असे आवाहन चोपडा शहर पो. स्टे.चे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी केले आहे.