नाशिककडून टोमॅटो भरून विक्रीसाठी आणणारी पिकअप व्हॅन (एमएच १५/जीव्ही ५११) ही समोरून येणाऱ्या मोटारसायकलला चुकवायला गेली असता मंगरूळ येथील अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाजवळ असलेले दुभाजक न दिसल्याने वाहन दुभाजकावर चढून ५० मीटरपर्यंत ओढत गेले. त्यानंतर वाहन रस्त्यावर कलंडले. धुळ्याकडून येताना रस्ता मोकळा असून, अचानक शाळेजवळ दुभाजक लागतात, त्यामुळे वाहनचालक गोंधळतात. यापूर्वीही १६ वाहनांना याठिकाणी दुभाजक न दिसल्याने अपघात झाले असून, वाहनांचे नुकसान होऊन काही जण बचावले आहेत.
याठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम झाले आहे. मात्र, सूचना फलक अथवा रिफ्लेक्टर लावलेले नाही, म्हणून वाहने दुभाजकावर आदळतात आणि अपघात होतात. दुभाजक दिसण्यासाठी मोठा लाइट अथवा रेडियम रिफ्लेक्टर लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
040921\04jal_3_04092021_12.jpg
दुभाजक न दिसल्याने पलटी झालेली पिकअप व्हॅन. (छाया : अंबिका फोटो अमळनेर)