शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वरखेडे-लोंढे प्रकल्प जूनमध्ये पूर्ण होणार- गिरीश महाजन यांनी चाळीसगाव पालिकेच्या शताब्दी महोत्सवात दिली ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:39 IST

वरखेडे-लोढें हे महत्वाकांक्षी धरण येत्या जूनमध्ये पूर्ण होणार असून, यासाठी गेल्या तीन वर्षात आमच्या सरकारने ११७ कोटी रुपयांचा निधी दिला. गेल्या १५ वर्षात या प्रकल्पासाठी फक्त २५ कोटी रुपये मिळाले होते. याच प्रकल्पाचा केंद्रीय बळीराजा सन्मान योजनेत समावेश केल्याने ४५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहेच. उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणाऱ्या नार-पार योजनेसाठी येत्या दोन महिन्यात केंद्र सरकार २० हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची ग्वाही जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.

ठळक मुद्देनार-पार योजनेसाठी २० हजार कोटींची तरतूदडास मुक्त चाळीसगाव शहराचा संकल्प७२ कोटींच्या सुधारीत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू

चाळीसगाव, जि.जळगाव : वरखेडे-लोढें हे महत्वाकांक्षी धरण येत्या जूनमध्ये पूर्ण होणार असून, यासाठी गेल्या तीन वर्षात आमच्या सरकारने ११७ कोटी रुपयांचा निधी दिला. गेल्या १५ वर्षात या प्रकल्पासाठी फक्त २५ कोटी रुपये मिळाले होते. याच प्रकल्पाचा केंद्रीय बळीराजा सन्मान योजनेत समावेश केल्याने ४५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहेच. उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणाऱ्या नार-पार योजनेसाठी येत्या दोन महिन्यात केंद्र सरकार २० हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची ग्वाही जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.शनिवारी सायंकाळी सात वाजता गिरीश महाजन यांच्या हस्ते चाळीसगाव पालिकेच्या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार उन्मेष पाटील होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, जि.प.चे शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, चाळीसगावच्या उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, पं.स.सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, गटनेते राजेंद्र चौधरी, के.बी.साळुंखे, मंगेश चव्हाण, घृष्णेश्वर पाटील, रमेश चव्हाण, श्यामलाल कुमावत यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.गिरणा नदीतील पाणी मन्याड धरणात टाकण्याची मागणी असो की, नदीजोड प्रकल्प, दुष्काळामुळे पाण्याची तीव्रता अधोरेखित झाली आहे. गिरणेवरील बलून बंधाºयांचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे. पाणी जपून वापरा, असे संदेश देतानाच गिरीश महाजन यांनी स्वच्छतेसाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचेही नमूद केले.उन्मेष पाटील यांचे मनोगतचाळीसगाव शहराचा डीपीआर मंजूर करून ७२ कोटींच्या सुधारीत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होत आहे. पुढच्या काळात डासमुक्त चाळीसगाव शहरासाठी भूयारी गटार कार्र्यान्वित करण्याचा प्रस्ताव केला जात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख दहा शहरांमध्ये चाळीसगावची गणना व्हावी, असे नियोजन पालिकेमार्फत केले जात असल्याचे सांगून आमदार उन्मेष पाटील गत पंधरा महिन्यात पालिकेने राबविलेल्या उपक्रमांचा आढावाही मांडला. मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी १०० कोटी रुपये निधी देण्याचे अश्वासन पूर्ण केले असून नविन ३४६ कोटी रुपयांच्या कामांचेही आज भूमिपूजन झाल्याचे त्यांनी सांगितले.आशालता चव्हाण, राजेंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वच्छाग्रह प्रकल्प व घंटागाड्या, जेसीपी यांचे लोकार्पण, शताब्दीच्या बोधचिन्हाचे अनावरणही झाले. आजी-माजी नगरसेवक, कर्मचारी यांना गौरविण्यात आले. पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्र्थींना आदेशाचे वितरणही केले गेले. प्रास्ताविक मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी, तर सूत्रसंचालन मनोहर आंधळे व अर्जुन परदेशी यांनी केले. आभार दिगंबर वाघ यांनी मानले. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षChalisgaonचाळीसगाव