शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेटाईन डे विशेष : एका मदतीने दोघांमध्ये फुलले प्रेमाचे ‘अंकुर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 12:12 IST

रामाच्या आगमनामुळे मावळला कुटुंबीयांचा विरोध

जळगाव : माणुसकीच्या नात्यातून प्रत्येकजण कळत न कळत कुणाला तरी मदत करतचं असतो. अशीचं एक मदत, शैलेंद्र सपकाळे यांच्या जीवनाला निलम यांच्या रुपाने कायमची साथं देणारी ठरली. आरटीओ कार्यालायत परवाना काढण्यासाठी निलम यांना केलेल्या मदतीमुळे, त्या ठिकाणी एकमेकांची मने जुळली आणि प्रेमांचे ‘अंकुर’ फुलले. त्यानंतर दोघांनी लग्न करुन, प्रेमाला एक नवी ओळख दिली आहे.कांचन नगर येथील शैलेंद्र सपकाळे हे गेल्या वर्षी एका कामासाठी जळगावातील आरटीओच्या कार्यालयात गेले होते. परवाना काढण्यासाठी एका खिडकी समोर पुरुषांची मोठी रांग लागली होती. यावेळी नयना या रांगेच्या सर्वांत शेवटी उभ्या होत्या. लवकर नंबर लागण्यासाठी रांगेतील पुरुषांकडून होणाऱ्या गोंधळाचा निलम यांना त्रास होत होता, तर आपला नंबर केव्हा लागेल, याची निलम या आतुरतेने वाट पाहत होत्या. यावेळी शैलेंद्र सपकाळे हे त्या ठिकाणाहुन जात असतांना, रांगेतील पुरुषांचा गोंधळ पाहिल्यानंतर, शैलेंद्र यांना या तरुणीला या गोंधळाचा त्रास होत असल्याचे जाणवले. यावेळी शैलेंद्र यांनी स्वत: मदत करुन, निलम यांचे तात्काळ लायसन्सचे काम करुन दिले. आम्ही आमच्या निर्णयावर ठामं आहोत.. शैलेद्र हे कष्टाळू असून, मला सुखी ठेवतील, याचा मला विश्वास आहे. अशा प्रकारे कुटुंबियांची समजूत घालून निलम व शैलेंद्र यांनी नशिराबाद येथील लक्ष्मी मंदिरात विवाह केला. निलम प्रमाणेच शैलेंद्र यांनादेखील कुटुंबियांचा विरोध झाला. मात्र, नंतर पुत्र रामाच्या आगमानामुळे विरोधही मावळला.मैत्रीचे रुपांतर झाले प्रेमातया मदतीने निलम व शैलेंद्र यांच्यात चांगली ओळख झाली. यावेळी निलम यांनी शैलेंद्र यांना आरटीओचे कुठलेही काम असल्यास मदतीचे आश्वासन दिले. यातून पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री होऊन, मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.मनं जुळली, मग जातीचा विचार का..?शैलेंद्र व निलम यांचे बहरलेले थेट लग्नापर्यंत येऊन ठेपले. मात्र, निलम यांच्या कुटुंबियांनी या लग्नाला विरोध केला. मात्र, निलम यांनी प्रेम हे एक पवित्र नातं आहे. या मध्ये गरिब वा श्रीमंती न पाहता,आमच्या दोघांची मने जुळली आहेत, आम्ही जातीचा विचार केलेला नाही..

टॅग्स :Jalgaonजळगाव