शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

विविध विकासकामांमुळे वाघळीचा होतोय कायापालट

By admin | Updated: April 11, 2017 16:04 IST

आमदार उन्मेष पाटील यांनी 2016 मध्ये आमदार आदर्श गाव योजनेत वाघळी या गावाची निवड केली.

 आमदारांचे दत्तक गाव : विविध योजनांमधून कामे सुरु, भरघोस निधी लवकरच

चाळीसगाव,दि.11- आमदार उन्मेष पाटील यांनी 2016 मध्ये आमदार आदर्श गाव योजनेत वाघळी या गावाची निवड केली. गत दीड वर्षात विविध योजनेतून गावात विविध विकास कामे सुरु केल्याने गावाचा कायापालट होत आहे. 
7 हजार लोकसंख्या
वाघळी हे  चाळीसगाव- भडगाव रस्त्यालगतचे गाव. 2016 मध्ये आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत येथे विकास कामे सुरु झाली. गावाची लोकसंख्या7 हजार 16 असून 1313ं कुटुंबे वास्तव्यास आहेत. 
शुद्ध पाण्यासाठी एटीएम 
गावात शुध्द पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करण्यात आली. यासाठी एटीएम योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आगाऊ नाममात्र पैसे भरुन 20 लिटर पाण्याचे जार उपलब्ध करुन दिले जातात. 20 लिटर पाणी केवळ 6 रुपयात ग्रामस्थांना याद्वारे मिळणार आहे. या प्रकल्पासाठी ग्रा. पं. ने बँकेकडून अर्थसहाय्य घेतले आहे. 
शाळा डिजिटल करणार
जि.प.ची प्राथ. शाळा डिजिटल केली जाणार आहे. यासाठी प्रायोगिक  तत्वावर काम देखील सुरु झाले असून सव्रेक्षही पूर्ण झाले आहे. शाळेत ई-लर्निगही क्लासरुमची संकल्पना राबविण्याचे नियोजन केले आहे.
ग्रीन व्हीलेज संकल्पना
ग्रा.पं. हद्दीत श्रमदानाच्या सिंचनाने ग्रीन व्हीलेज ही संकल्पना देखील राबवली जाणार आहे.  याच परिसरात  150 झाडे फुलणार आहेत. गावाचा पाणी प्रश्नही सोडविण्यात आला आहे.  मुंदखेडे धरणातून  2.16 टीएमसी पाण्याचे आवर्तन सोडले जाणार आहे.
व्हीलेज डेव्हलपमेंटसाठी साडेचार कोटीचा प्रस्ताव 
आदर्श गाव योजनेअंतर्गत व्हीलेंज डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात आला आहे.  यासाठी वेगवेगळ्या विकास कामासाठी  4 कोटी 49 लाख रुपयाचा  प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाने मंजूरही केला आहे. मात्र निधीची प्रतीक्षा आहे.
डासमुक्त गाव
गाव अंतर्गत शोषखड्डे करण्याचा उपक्रम राबवून डासमुक्त गाव हा पायलट प्रयोगही करण्यात येणार आहे. संपूर्ण गावात ई-सातबारा ही संकल्पना महसूल यंत्रणेमार्फत राबवली जात आहे.
बसस्थानक व महिला शौचालय समस्या सुटावी
वाघळी गावात अनेक समस्या आहेत. विशेषत: महिलांच्या शौचालयांचा प्रश्न गंभीर झाला असून येथे घाणीचा विळखा आहे. यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकाचीही समस्या आहे. महिला शौचालये पूर्णपणे मोडकळीस आले आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्याही उग्र झाली आहे. समस्या व प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा  प्रकाश सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
 
राज्यातील  इतर आदर्श गावांचे प्रयोग अभ्यासून  वाघळी गावाची ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. मूलभूत सुविधासह पर्यटन व शैक्षणिक विकासही करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ही कामे झाली आहेत. मदुराई देवी मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी पुरातत्व  विभागाकडून साडेतीन कोटी निधी मंजूर झाला आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे. गावाला जोडणा:या रस्त्यांसाठीही निधी देण्यात आला आहे.
- उन्मेष पाटील, आमदार चाळीसगाव
जलसिंचन कामे गावात झाली आहेत. बंधारा, शिवारातील जलपुर्नभरणाला अग्रक्रम दिलाय. दत्तक गाव योजनेतील निधी त्वरित मिळावा, अशी अपेक्षा आहे.  तरुणांसाठी अभ्यासिका,  पाणीपुरवठा आदी बरोबरच ग्रा.पं. च्या 160 एकर जमीनीवर शेतीचाप्रयोग करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव दाखल केला आहे. 
- विकास त्र्यंबक चौधरी, सरपंच वाघळी
 
जिल्हा नियोजन मंडळाकडे गावविकासाचा  प्रस्ताव  दाखल आहे. आमदार निधीतून कामे झाली असली तरी आदर्श गाव योजनेसाठीच्या निधीची प्रतीक्षा आहे.  आमदार  सुरेश भोळे यांच्या माध्यमातून वाघळी ते चांभाडी रस्त्यावरील पुलाचे काम सुरु असून बँकेच्या सहाय्याने पाण्याचे एटीएमचे काम पूर्ण झाले असून हा प्रकल्पाची पूर्णत:  सौर ऊज्रेवर चालणारी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. गावास आदर्श करुन दाखवायचे आहे.
-ए.टी.मोरे, ग्रामसेवक वाघळी