शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

लसींचा ठणठणाट, आजही केंद्र बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात कोविड प्रतिबंधक लसींचा साठा संपला असून लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. लस न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हाभरात कोविड प्रतिबंधक लसींचा साठा संपला असून लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. लस न आल्याने बुधवारी शहरातील सर्वच केंद्र बंद राहणार आहे. गुरूवारी सायंकाळी जिल्ह्याला लस प्राप्त होण्याची शक्यता असून शुक्रवारी केंद्र उडघतील.

शहरातील महापालिकेची सर्व केंद्र बुधवारी बंद राहणार असल्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी कळविले आहे. जिल्ह्यात ३५० वर केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यातुलनेत लसींचा साठा अगदीच मुबलक उपलब्ध होत आहेत. त्यातच जो साठा येत आहे. तो दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात आल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे पहिला डोस सुरू झाल्यानंतर केंद्रांवर पुन्हा गर्दी वाढणार आहे. दरम्यान, सोमवारी महापालिकेचे केंद्र सुरू होते, मात्र, लस नसल्याने ते मंगळवारी बंद ठेवण्यात आले होते. बुधवारी पुन्हा लस नसल्याने शिवाय गुरूवारीही मिळण्याची शक्यता कमीच असल्याने लसीकरणासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.