शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वसूचना न देता लसीकरण बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:12 IST

जामनेर : कोणतीही पूर्वसूचना न देता लसीकरण बंद ठेवल्याने लसीकरणासाठी रांगेत थांबलेल्या नागरिकांना गुरुवारी सकाळी मोठा मनस्ताप सहन करावा ...

जामनेर : कोणतीही पूर्वसूचना न देता लसीकरण बंद ठेवल्याने लसीकरणासाठी रांगेत थांबलेल्या नागरिकांना गुरुवारी सकाळी मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

न्यू इंग्लिश स्कूलमधील केंद्रावर हा प्रकार घडला. संतप्त नागरिकांनी केंद्रासमोर असलेल्या तहसील कार्यालयात तहसीलदार अरुण शेवाळे यांना याबाबत सांगितले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटा, असे त्यांनी सांगितल्याने नागरिक आरोग्य विभागाबद्दल संताप व्यक्त करीत माघारी परतले. दरम्यान, शुक्रवारीदेखील लसीकरण बंदच राहील, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांनी दिली.

साठ हजार लोकसंख्येच्या जामनेर शहरात लसीकरणासाठी एकच केंद्र असल्याने नागरिकांची नेहमीच मोठी गर्दी असते.

वाढीव केंद्राबाबत वारंवार मागणी करूनदेखील आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिकांना तासन‌्तास रांगेत ताटकळत बसावे लागते.

आज लसीकरणासाठी केंद्रावर महिला व पुरुष मोठ्या संख्येने पहाटेपासूनच रांगेत उभे असताना त्यांना लसीकरण करण्याऐवजी न्यायालयात जाऊन लसीकरण केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

रोजंदारी बुडाल्याने संताप

मजुरी करणाऱ्या महिला रोजंदारी बुडवून लसीकरणासाठी थांबून राहिल्याने रोजंदारीही बुडाली व लसही मिळाली नाही, अशी तक्रार त्यांनी केली.

कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने आरोग्य विभागाने निम्मे कर्मचारी कमी केल्याने लसीकरणासाठी कर्मचारी कमी पडतात. गुरुवारी उपलब्ध लसीतून न्यायालयीन कर्मचारी व वकिलांना न्यायालयात जाऊन लसीकरण करावे लागल्याने केंद्रावरील लसीकरण बंद ठेवावे लागले. शुक्रवारी देखील लसीकरण बंदच राहील.

- डॉ. विनय सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, जामनेर

080721\08jal_2_08072021_12.jpg

जामनेर येथील तहसीलबाहेर लसीअभावी संताप व्यक्त करणारे नागरीक