शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अँटीजन टेस्ट केल्याशिवाय लसीकरण करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रच कोरोना हॉटस्पॉट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रच कोरोना हॉटस्पॉट ठरू पाहत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांची अँटीजन टेस्ट केल्याशिवाय त्यांना लस देण्यात येऊ नये अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी दिल्या.

शहरातील लसीकरण केंद्राचे नियोजन करण्यासाठी आणि नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मनपा नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, गजानन पाटील, मनपा वैद्यकीय अधिकारी राम रावलानी, डॉ.शिरीष ठुसे आदी उपस्थित होते. लसींचा पुरवठा कमी होत असल्याने आपण योग्य रितीने नियोजन करावे, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पाणी आणि ग्रीननेटची व्यवस्था करावी, रांग लावून टोकन सिस्टीमचा वापर करावा अशा सूचना महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केल्या. जळगावात १८ ते ४५ आणि ४५ वरील नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी वाढत आहे. शासनाकडून लस पुरवठा नियमीत होत असेल तर नवीन केंद्र सोमवारपासून सुरू करण्यात यावे. जेणेकरून नागरिकांची सोय होईल असे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले १८ ते ४५ वयोगट आणि ४५ वयोगटावरील नागरिकांची वेगवेगळी व्यवस्था करण्यात यावी. वेगवेगळे केंद्र निश्चित केल्यास नागरिकांची गर्दी होणार नाही अशा सूचना महापौर जयश्री महाजन यांनी केल्या.