चुंचाळे, ता. यावल : यावल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे जिल्हा परिषद सदस्य अरुणा रामदास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून दोन हजार कोविशिल्ड लस मिळाली आणि याच संधीचे सोने करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. मनीषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली २२०० लोकांना लस देऊन किनगाव आरोग्य केंद्राने यावल तालुक्यात उच्चांक गाठून विक्रम नोंदविला.
दोन हजार लसींचे वितरण करताना गिरडगाव ३३०, उंटावद २७५, मालोद २२०, आडगाव ४८४, किनगाव ६१६, डोणगाव २७५, असे लसींचे डोस १८ वर्षांवरील नागरिकांना देण्यात आले.
त्यात उंटावद आणि गिरडगाव येथे पहिल्या डोसचे १०० टक्के काम झाले आणि दिवसभरात आरोग्य केंद्राने २२०० लस देऊन उच्चांक गाठला आणि दोन गाव १०० टक्के करून रात्री १०.१५ पर्यंत काम सुरू ठेवून विक्रम नोंदविला.
यासाठी सर्व सहकारी डॉ. अमोल पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अशपाक, डॉ. वकार, डॉ. मोहसीन, डॉ. धनंजय, तसेच आरोग्य सहायिका उषा पाटील, आरोग्यसेविका कुमुदिनी इंगळे, भावना वारके, कविता सपकाळे, शीला जमरा, कल्पना सूर्यवंशी, मंगला सोनवणे, नावादी बरेला, आरोग्यसेवक विठ्ठल भिसे, दीपक तायडे, जीवन सोनवणे, मनोज बरेला, डेटा एन्ट्री भूपेंद्र महाजन, रवींद्र व्हावी, प्लेबोटोमिस्ट जीवन महाजन, सरदार कानाशा, वाहनचालक कुर्बान तडवी आणि सर्व आशासेविका यांनी प्रयत्न केले आणि आमची मोहीम फत्ते केली.
किनगावच्या सरपंच निर्मला संजय पाटील म्हणाल्या की, आमच्या गावाला मनीषा महाजन यांच्यासारख्या डॉक्टर मिळाल्या म्हणून लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले.