जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांच्या सूचनेनुसार, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली १२ जुलैला वडगाव आरोग्य उपकेंद्रात लहान मुलांमधील ‘न्यूमोकोकल’ आजार आणि त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी, बालकांचे पूर्णपणे संरक्षण केले जावे, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचे आरोग्य सहायक प्रकाश पारधी, आरोग्यसेवक विजय देशमुख, आरोग्य सेविका-उज्वला परदेशी यांच्या हस्ते स्वागत केले गेले.
वडगांव बुद्रुक उप आरोग्यकेंद्र येथे ग्रामपंचायत सरपंच-कडू बारकू कोळी, उपसरपंच नामदेव बाबूराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनकर पाटील, वंदना कोळी, गणेश पाटील, संगीता कोळी, सोनाली पाटील, ग्रामसेवक-कांतीलाल कोळी यांच्या हस्ते न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन या लसीचे उद्घाटन करण्यात आले.
शिबिरासाठी आरोग्य सहायक प्रकाश पारधी, विजय देशमुख, आरोग्य सेविका उज्ज्वला परदेशी, गट प्रवर्तक शालिनीबाई सोनवणे, आशा सेविका अनिता निळे, अर्धवेळ परिचारिका वंदना साळुंखे, आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्यसेवक विजय देशमुख यांनी केले.