शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने नागरिकांसाठी शनिवारी मोफत कोविड लसीकरण आयोजित करण्यात आले असून, पारस मंगल कार्यालयात हे लसीकरण होणार असून, दोन हजार लसी उपलब्ध आहेत.
तिसऱ्या लाटेची शक्यता, बहुतांश नागरिक पहिल्या व दुसऱ्या लसीपासून अद्यापही वंचित आहेत. शेंदुर्णीत लोकसंख्येच्या मानाने लसी कमी प्रमाणात येत आहेत. भल्या पहाटेपासून नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नंबर लावतात. कूपन दिल्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण सुरू आहे. मात्र, गावाची लोकसंख्या लक्षात घेता अधिक लसी उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी होत होती. याचाच विचार करता शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने भव्य कोविड लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शनिवारी पारस मंगल कार्यालयात कोविड लसीकरण होणार असून तब्बल दोन हजार कोविड लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपले, परिवाराचे व गावाचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी याचा लाभ घ्यावा. लसीकरणासाठी येताना आधारकार्ड सोबत आणायचे आहे.
नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेंदुर्णी नगरीच्या नगराध्यक्षा विजयाताई खलसे, उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजीद पिंजारी, सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी केले आहे.