शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नंबरप्लेट बदल करून चोरीच्या दुचाकीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:31 IST

जळगाव : दुचाकी चोरी करायच्या व नंबरप्लेट बदल करून दुचाकीचा वापर करणाऱ्या जीवन सुकदेव ठाकरे (वय २२) व पवन ...

जळगाव : दुचाकी चोरी करायच्या व नंबरप्लेट बदल करून दुचाकीचा वापर करणाऱ्या जीवन सुकदेव ठाकरे (वय २२) व पवन सुनील कोळी (वय २०) दोन्ही रा. डांभुर्णी, ता.यावल या चोरट्यांचा शहर पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी नगरातील चंद्रकांत गजानन बोदवडे यांची दुचाकी (क्र.एम.एच १९ सीजी ३५६५)१२ सप्टेंबर २०१९ रोजी शहरातील नेहरु पुतळ्याजवळील बँकेजवळून चोरी झाली होती. गणेश विसर्जनाच्या दिवशी ही दुचाकी चोरी झाली होती. बोदडे हे दुचाकी लावून गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीत गेले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

पेट्रोलिंगदरम्यान चौकशीत फुटले बिंग

शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी भास्कर ठाकरे, गणेश पाटील, ओम पंचलिंग व नीलेश पाटील हे १४ डिसेंबर रोजी शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळ पेट्रोलिंग करत असताना दोन जण दुचाकीवर आले. पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता, त्यांच्या बोलण्यात गोंधळ उडत होता. संशय बळावल्याने वाहन परवाना व कागदपत्रांची मागणी केली असता, अधिकच संशय आला. त्यामुळे दोघांना पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्याकडे नेण्यात आले. तेथे सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, अक्रम शेख, प्रफुल्ल धांडे, रतन गीते व गणेश पाटील यांनी चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली देऊन त्यावरील नंबरदेखील बनावट असल्याचे सांगितले. दरम्यान, या दोघांसोबत आणखी एक साथीदार असल्याचे निष्पन्न झाले आहे; मात्र तो फरार आहे. अधिकच्या चौकशीत त्यांनी आणखी एक दुचाकी काढून दिली.