शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाळू चोरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:27 IST

नूतन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची मुलाखत

ठळक मुद्दे प्रश्न समजून घेण्यावर भर

जळगाव : जिल्ह्यातील वाळू चोरी रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी शक्य असल्याचे प्रतिपादन नूतन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.ढाकणे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. यानंतर मंगळवार ‘लोकमत’शी बोलतांना त्यांनी वरील ही माहिती दिली. ढाकणे यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: नदीपात्रात जाऊन वाळूचे वाहन पकडणे अपेक्षित नाही. त्यांनी तेच काम त्यांच्या यंत्रणेमार्फत अचूकपणे करवून घेणे अपेक्षित आहे. ते करण्यासाठी काय काय करता येईल? याची माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल.जप्त वाळू वाहनांची विल्हेवाट लावणारअवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आलेली आहेत. ती अस्ताव्यस्त पडलेली आहे. मात्र जर संबंधीत वाहनमालक दंड भरत नसेल तर या वाहनांची विल्हेवाट लावायला हवी. अन्यथा हीच पडून असलेली वाहने डेंग्यूला कारणीभूत ठरतील. त्यामुळे याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली.शून्य खर्चाचे काम सफाईजिल्हाधिकारी ढाकणे म्हणाले की, सफाई हे असे काम आहे की त्यासाठी खर्च लागत नाही. सोलापूर मनपात असताना तर तेथील घंटागाड्या वेळेवर जाण्यासाठी तसेच किती कचरा उचलला यासाठी त्याचप्रमाणे पाण्याच्या टँकरवर नियंत्रण ठेवण्यासाठी अ‍ॅप बनवून घेतले. त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात कपात झाली. मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचीही पाहणी केली. मात्र अनेक विभागांमध्ये साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे व सफाईकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. वास्तविक सफाईला खर्च लागत नाही. हे काम केले तर आपण आपले आरोग्य चांगले ठेवून दवाखान्याचा लाखो रूपयांचा खर्च वाचवू शकतो.प्रश्न समजून घेऊन कामाचे नियोजनजिल्हाधिकारी पदावर रूजू झाल्यानंतर जिल्ह्यात कोणत्या कामांना प्राधान्य देणार? याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मनपा आयुक्त म्हणून काम केले. तेथील प्राधान्याचे विषय हे ठरलेले असतात. रस्ते, गटारी, पाणी, पथदिवे हेच प्राधान्याचे विषय असतात. त्यानंतर इतर प्रश्नांवर निर्णय घेण्याची वेळ येते. मात्र महसूल विभागात तब्बल २० वर्षांनी पुन्हा आलो असल्याने जिल्ह्याच्या प्रश्नांची माहिती घेऊन कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे? याबाबत नियोजन करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :interviewमुलाखत