शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामकाजात मराठीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 01:01 IST

मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘शासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर’ याविषयी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील नायब तहसीलदार पंकज पाटील...

ब्रिटिशपूर्व भारतातील प्रशासकीय व्यवस्थेत फारसी भाषेचा वापर करणाऱ्या राज्यकर्त्यांचा फार मोठा काळ लोटल्याने कार्यालयीन कामकाजात फारशी भाषेचे प्रचलन जास्त होते. ब्रिटिश काळात तसेच स्वातंत्र्योत्तर भारतात काही वर्षे कार्यालयीन कामकाज हे इंग्रजी भाषेतून चाले. शासकीय व्यवस्थेत महसूल प्रशासनास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. जनतेचा सर्वात जास्त दैनंदिन संपर्क या विभागाशी येतो. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी मध्य व बेरार प्रांत आणि निजाम शासीत प्रदेशातील जमीन महसूलविषयक कायदे व कार्यालयीन कामकाज यात फारशी भाषेचा प्रभाव होता.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अस्तित्वात आला तेव्हा सदरहू प्रांतातील कायदेदेखील एकत्र झाले. त्यामुळे नझुल, नाझर, वाजीब-ऊल-अर्ज, पेशकार, निस्तार, कब्जेदार, कास्तकार, ईस्तेगाशा, सामनेवाला, मामलेदार वगैरे फारशी शब्द आजदेखील महसूल कार्यालयीन भाषेत वापरले जातात. आजच्या शासन व्यवस्थेच्या संरचनेवर ब्रिटिशकालीन शासन व्यवस्थेचा प्रभाव असल्याने कार्यालयीन भाषेत थोडेफार इंग्रजी शब्द आहे. तसेच प्रचलनात येतात. उदा.नोटीस, क्लासवारी, रजिष्टर वगैरे.शासकीय व्यवहारात मराठी भाषेच्या स्वरुपाबाबत कायदे-अधिनियम-नियम, कार्यालयीन कामकाज व सर्वसामान्य जनतेशी होणारा पत्रव्यवहार या तीन स्तरावर फरक असतो. प्रमुख कायदे मुख्यत्वे इंग्रजी भाषेत निर्मिले जाऊन नंतर मराठीत भाषांतरित झाल्याने महसूल कायद्यातील भाषा सर्वसामान्यांच्या आकलना पलिकडे जाते. मूळातच कायद्याच्या भाषेत प्रत्येक कलमात बरेचसे किंतु, परंतु, किंवा यांचा भडीमार असल्यामुळे पूर्ण बोध होत नाही. आजकाल महसूल विभागातील सर्वच व्यवहार मराठी भाषेतूनच होतात. अ‍ॅलिनेशन व आयपीएल रजिष्टर सारखे जुने कागदपत्र मात्र अजूनही इंग्रजीतच आहेत. जमीन मालकी हक्कविषयक १९५० पूर्वीचे बरेचसे पुरावे हे मोडी लिपीत लिहिल्याचे दिसून येते. डिजीटलायजेशन अंतर्गत हे सर्व जुने दस्ताऐवज आहे तसेच स्कॅन करण्यात आले आहेत. मोडीतून मराठी देवनागरी लिपीत अजून लिप्यांतर होणे बाकी आहे. शासकीय दस्ताऐवज सुव्यवस्थित ठेवणे व त्याचे वर्गीकरण याचा आत्मा असणारे अँडरसन मॅन्युअल आजही इंग्रजीतच आहे. वैयक्तिक स्तरावर त्याचे मराठीत भाषांतराचे प्रयत्न झालेत पण शासकीय पातळीवरुन भाषांतर होणे गरजेचे आहे. डिजीटलायजेशनमध्ये केंद्र शासनाशी संबंधित संकेतस्थळांवर इंग्रजीतच माहिती भरावी लागते. परंतु राज्य शासन स्तरावरील वेबसाईट्स या मुख्यत्वे मराठी भाषेतच असून मराठीतच माहिती साठवली जाते. शासकीय दैनंदिन कामकाजात 'एमएस आॅफिस'मधील सॉफ्टवेअरचा वापर वाढतोय परंतु सदर सॉफ्टवेअर हे मराठी भाषेशी सुसंगत होण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे आवश्यक आहे असे वाटते.-पंकज पाटील, नायब तहसीलदार, पारोळा, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यParolaपारोळा