शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यातील साकळी येथे आजपासून उर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 15:25 IST

यावल तालुक्यातील साकळी येथील हजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या ऐतिहासिक उर्स सोहळ्यास २ पासून सुरुवात होत आहे.

ठळक मुद्देहजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या उर्स सोहळ्यानिमित्त उत्साहजिल्ह्यासोबतच राज्यभरातील भाविकांची असते उपस्थितीउर्स म्हणजे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक

यावल, जि.जळगाव : यावल तालुक्यातील साकळी येथील हजरत सजनशाह वली (रहे.) यांच्या ऐतिहासिक उर्स सोहळ्यास २ पासून सुरुवात होत आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या उर्स सोहळ्यास शेकडो वर्षांची परंपरा आहे. या दिवशी सालाबादप्रमाणे बाबांच्या संदलनिमित्त वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. संदलनिमित्त जिल्ह्यासोबतच महाराष्ट्राबाहेरुन हजारो भक्त बाबांच्या दर्ग्यावर दर्शनासाठी येतात.साकळी येथील हा उर्स म्हणजे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक मानले जाते. गावाचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा आहे. प्राचीन काळी डांभुर्णी, ता.यावल येथील राजपूत परिवारातील महिला राजवंतीबाईस हजरत सजनशाह वली (रहे.) बाबांनी बहिण मानून राखी बांधून घेतली व राखीची भेट म्हणून जमिनी दिल्या. तेव्हापासून वंश परंपरेने या महिलेच्या परिवारातून आजही एकादशीला संदलनिमित्त सर्वप्रथम बाबांच्या पवित्र मझ़ारवर चादर चढविली जाते.ऐतिहासिक दर्गा - हजरत सजनशाह वली(रहे.) यांचे नाव शाह अ.लतीफ (रहे.) असे आहे. ख्याजा अजमेरी यांच्या सहकाऱ्यांमध्ये गणना होते. बाबा शेकडो वर्षांपूर्वी साकळी येथे आले. त्यांचा दर्गा ऐतिहासिक आहे. दर्गा चारही बाजूंनी पाहिल्यावर सारखाच दिसतो. दर्गा अतिशय कलाकुसरतेने बांधलेला असून लाकडाचा दरवाजा आहे.आम लंगरचा कार्यक्रम- संदलनिमित्त २ रोजी कय्युमशाह बाबा व त्यांचे सहकारी व गावकºयांंच्या मदतीने दर्गा परिसरात लंगरे आम (महाप्रसाद) ठेवला आहे. हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. त्याचप्रमाणे रात्री दर्गासमोर महफिले समाँ या कार्यक्रमात कव्वाल हाजी अ. लतीफ हैराँ हे ईश्वरभक्ती व नआत म्हणून भाविकांना मंत्र-मुग्ध करणार आहे.या दर्गापरिसरात उर्सनिमित्त पाच बाजार भरविले जातात. या उर्स दरम्यान सर्वत्र उत्साहाचे व धार्मिक वातावरण असते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमYawalयावल