शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

विद्यापीठ प्रशाळांमध्ये आकारले जाणार चार टप्प्यात प्रवेश शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 12:46 IST

विद्यार्थी हिताचा विचार

जळगाव : सध्या प्रथम शैक्षणिक वर्ष सोडून उर्वरित अभ्यासक्रम १ आॅगस्टपासून व प्रथम वर्ष १ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन शैक्षणिक शुल्क घेण्यासाठी आॅनलाईन पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध केली जात आहे. विद्यार्थ्यांकडून हे शैक्षणिक शुल्क टप्प्याटप्याने कसे आकारले जाईल याची सुद्धा काळजी घेण्याचे महाविद्यालयांना सांगण्यात आले आहे. विद्यापीठ प्रशाळांमध्ये तर हे प्रवेश शुल्क चार टप्प्यात आकारले जाणार आहे. आर्थिक मंदी लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ पासून लागू होणारी शुल्क वाढ तूर्त या वर्षासाठी स्थगित करण्यात आली असल्याची माहिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली़कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे सर्व क्षेत्रात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले मते मांडली. ते म्हणाले की,कोरोना पूर्वीचे व कोरोनोत्तर जग यामध्ये मोठी तफावत असणार आहे. उच्च शिक्षण क्षेत्र देखील याला अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर काही नवे बदल विद्यापीठांना आत्मसात करावे लागणार आहेत. कोरोनाचे संकट नाहीसे होत नाही तोवर आॅनलाईन शिक्षणाचा एक पर्याय विचारात घेतला जात असला तरी आपल्या विद्यापीठाचे कार्यक्षेत्रात आदिवासी, दुर्गम भाग देखील अधिक आहे. त्याचाही विचार करावा लागेल. तूर्त विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संलग्नित महाविद्यालयांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित यासाठी महाविद्यालयांकडून आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेद्वारे तात्पुरता प्रवेश सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयात अध्यापनास येतील़ त्यावेळी प्रवेशासाठी आवश्यक मुळ कागदपत्रे तपासून त्यांचा प्रवेश निश्चित व नियमित करावा असे सांगण्यात आले आहे. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल. विद्यापीठ प्रशाळा व विभागातील प्रथम वर्ष सोडून उर्वरित वर्गामध्ये प्रवेश घेण्याची सोय देखील २८ जुलै पासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत जो निर्णय होईल त्यानंतर पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या प्रवेशाबाबत सूचना दिल्या जातील.प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण सुरुआॅनलाईन अध्यापनासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले का? असे विचारले असता कुलगुरु म्हणाले की, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व प्राध्यापक हे आॅनलाईन शिक्षणासाठी तयार व अद्ययावत व्हावेत यासाठी २० ते ३१ जुलै पर्यंत सर्व विद्याशाखांच्या प्राध्यापकांचे प्रशिक्षण घेतले जात आहे. आता अध्ययन व अध्यापनाच्या नव्या पद्धती स्वीकाराव्या लागतील.आॅनलाईन शिक्षणावर भर दिला जाऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्राध्यापकांना या बदलाची जाणीव करून देत अध्यापन शिक्षण प्रक्रियेत ई-लर्निंग नमुना रूपांतर करून पुढील स्तरावरील अध्यापन शिक्षण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आॅनलाईन लर्निंग लाईव्ह क्लासरूम टिचिंग प्लॅटफॉर्म स्थापन करून या अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण होत असून याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही.कोरोनामुळे जे-जे नवे बदल शिक्षण क्षेत्रात आता येऊ घातले आहेत. या बदलांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सक्षमपणे सामोरे जाण्याच्या तयारीला लागले आहे.-प्रा़ पी़पी़पाटील, कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

टॅग्स :Jalgaonजळगाव