शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात निवडणुकांच्या हालचालींना वेग

By admin | Updated: May 24, 2017 00:33 IST

निवडणूक लढवू इच्छिणाºया प्रतिनीधींची २९ ला बैठक : ३० रोजी निवडणूक कार्यक्रम होणार जाहीर?

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाच्या प्राधिकरणाच्या निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आला आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ प्रशसनाने तयारी सुरू केली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेच्या नोंदणीकृत पदवीधरांसाठी दहा जागांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पदवीधरांचे माजी प्रतिनिधी तसेच पदवीधर गटातून निवडणूक लढवू इच्छिणाºया विद्यार्थी प्रतिनीधींच्या बैठकीचे आयोजन २९ मे रोजी दुपारी ३ वाजता विद्यापीठात करण्यात आले आहे. १ मार्च रोजी अकृषी विद्यापीठांसाठी नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार विविध प्राधिकरणाच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. प्राधिकरणाचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठीच्या पात्रता व अटी शासनाकडून २९ एप्रिल रोजी काढलेल्या परिपत्रकात आधीच जाहीर करण्यात आल्या आहेत. या विषयांवर होणार चर्चासुधारित विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांसाठी दहा जागांची तरतूद करण्यात आली आहे. या निवडणुकांच्या चर्चेसाठीच २९ मे रोजी विद्यापीठात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत पदवीधरांच्या नोंदणी संदर्भात चर्चा करणे, सन २०१७ चे एकरुप परिनियम क्रमांक २ मध्ये नमूद केल्याप्रमाणे विहित नमून्यात अर्ज भरणे, विहित शुल्क व दस्तऐवजांसह अर्ज जमा करणे याबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीसाठी पदवीधरांचे माजी प्रतिनीधी व निवडणूक लढवू इच्छिणाºया विद्यार्थी प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी व प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी केले आहे. नवीन नावनोंदणी करण्यात येईलदरम्यान यापूर्वीच्या विद्यापीठ कायद्यानुसार २०१५ मध्ये विद्यापीठाची विविध प्राधिकरणे गठित करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यावेळी नोंदणीकृत पदवीधरांचे नोंदणी अर्ज व ज्यांनी पूर्वी नोंदणी केली होती त्यांची मतदार यादीत नावे समाविष्ठ करण्यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याची कार्यपध्दती अवलंबिण्यात आली होती. मात्र आता नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यामुळे पदवीधरांची नव्याने नाव नोंदणी करण्यात येणार        आहे. ३० मे पर्यंत निवडणूक कार्यक्रम होणार जाहीरप्राधिकरण निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याबाबतचे नियम व अटींची माहिती देण्यास शासनाकडून उशीर झाला असला तरी, उमवि प्रशासनाने निवडणुकांसाठी मार्च महिन्यातच तयारी सुरू केली         होती. त्यानुसार विद्यापीठाने निवडणूक कार्यालयदेखील सुरू केले होते. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे अधिकार हे कुलगुरूंकडे आहेत. ३० मे रोजी कुलगुरू निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. प्राधिकरण निवडणुका शांततेत व बिनविरोध पार पाडण्यासाठी उमवि प्रशासनाकडून सध्या प्रयत्न सुरू असले तरी, बिनविरोध निवडणुका न झाल्यास त्या दृष्टीनेदेखील विद्यापीठाची तयारी आहे. निवडणूक खर्चासाठी उमविने १ कोटींची रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात याआधीच केली आहे.