शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यावल तालुक्यातील साकळी येथे विहीर पुनर्भरणाचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 16:38 IST

गेल्या वर्षाचा दुष्काळ, कमी पडलेला पाऊस यामुळे साकळीसह परिसरातील भूगर्भातील जलपातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. तथापि, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या मदतीविना साकळी येथील दोघा भावांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या मदतीने पावसाचे पाणी कोरड्या विहिरीत उतरवून विहीर पुनर्भरणाचा उपक्रम राबविला आहे.

ठळक मुद्देदोघा भावांच्या पुढाकाराला ग्रामस्थांनी केले सहकार्यशासनाच्या मदतीविना राबविला उपक्रम

सुधीर चौधरीचुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : गेल्या वर्षाचा दुष्काळ, कमी पडलेला पाऊस यामुळे साकळीसह परिसरातील भूगर्भातील जलपातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतीला आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. तथापि, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या मदतीविना साकळी येथील पिपºया कॉलनी भागातील दोघा भावांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या मदतीने पावसाचे पाणी कोरड्या विहिरीत उतरवून विहीर पुनर्भरणाचा उपक्रम राबविला आहे.साकळी येथील पिपºया कॉलनी परिसरात एक विहीर असून, ही विहीर सध्या कोरडीठाक पडली आहे. या कॉलनीच्या जागेवर अनेक वर्षा अगोदर शेत-शिवार होते. परंतु या ठिकाणी प्लॉट पडून नागरिकांचा रहिवास वाढला. तसेच ही कोरडी विहीरही दुर्लक्षित बनली होती. तथापि, भूगर्भातील खोलवर गेलेली जलपातळी लक्षात घेऊन पावसाचे वाया जाणारे पाणी सदर कोरड्या विहिरीत उतरविण्याकरता सर्व रहिवाशांनी ठरवले. तसेच या भागातील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते दिनेश माळी व गणेश माळी या दोघा भावांनी विहीर पुनर्भरण उपक्रमासाठी पुढाकार घेतला. या भागात पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने मोठमोठे डबके होतात. त्यामुळे नागरिकांना वापरण्यासाठी त्रासही होतो. तेव्हा काही रहिवाशांच्या सहकार्यातून रस्त्यावरचे पावसाचे पाणी उताराकडच्या भागात उतरवून एका चारीच्या मागार्ने विहिरीच्या भागाकडे वळविले आणि विहिरीच्या भागास पाईप लावून संपूर्ण रस्त्यावरचे पाणी विहिरीत उतरवण्यात आले. हा उपक्रम जेव्हा यशस्वी झाला तेव्हा या नागरिकांना खूप आनंद झाला. या उपक्रमातून परिसरातील पावसाचे वाया जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरवले जाणार आहे. या उपक्रमाकरिता देवीदास माळी, शिवाजी सोनवणे, नबाब तडवी कमाल मिस्त्री, भाया पावरा या रहिवाशांचे सहकार्य लाभले.शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय फक्त लोकसहभागातून 'पाणी आडवा- पाणी जिरवा' हा उपक्रम आम्ही राबवू शकतो, असे या रहिवाशांनी विहीर पुनर्भरणाच्या उपक्रमातून दाखवून दिले आहे. त्यामुळे दिनेश माळी व गणेश माळी या दोघा भावांसह रहिवाशांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातYawalयावल