चाळीसगाव : अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना रोहिणी ता. चाळीसगाव येथे गावाजवळ सोमवारी रात्री १०.३० वाजता घडली.
नांदगाव ते चाळीसगाव रोडवरील रोहिणी गावाजवळील शिव नाल्याच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला (क्र. एम.एच.०३ ए.सी. ७५०) जोरदार धडक दिली. यात किरण भिकन मोरे (२२, रा. देवारी कनाशी, ता. भडगाव) व विजय अशोक मोरे (२२, रा. बोदडे, ता. भडगाव) हे दोघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर वाहनचालक तेथून पसार झाला.
किरण यांचे वडील भिकन विश्राम मोरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास भालचंद्र पाटील हे करीत आहेत.