शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या माहितीशिवाय कर्जमाफीचा अजब अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:52 IST

ना मुद्दल, ना व्याज : कोणत्या आधारावर मिळणार लाभ!

ठळक मुद्दे आपलं सरकार केंद्रावर गर्दी वाढली आॅनलाईनलाही आॅप्शनच नाहीरक्कमेचा उल्लेखच नसल्याने अर्ज कशासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कबभळाज : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफीचा आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची ‘आपलं सरकार’ सेवा केंद्रांवर गर्दी वाढू लागली आहे. मात्र या अर्जात शेतकºयाकडे किती कर्ज आहे, याची माहिती नमूद करण्यासाठी ‘आॅप्शन’च नसल्याने गोंधळ उडाला आहे. गुरुवार आणि आधीच्या काही दिवसात हे चित्र दिसून आले.आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी गेलेल्या कर्जदार शेतकरी व त्याची पत्नी यांच्या नावे आय.डी. व पासवर्ड तयार केला जातो. नंतर त्याचे नाव, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, कर्ज खात्याचा क्रमांक, बचत खात्याचा क्रमांक, कर्ज घेतले त्या संस्थेचे व बॅँकेचे नाव इत्यादी माहितीसह तो कोणत्या लाभास पात्र आहे, त्या पर्यायावर बरोबरची खूण करून दिलेले प्रतिज्ञापत्र अशी माहिती मोबाइल क्रमांकासह भरायची आहे. पण त्यात नेमके मुद्दल व व्याज किती याची माहिती विचारलेली नाही. सॉफ्टवेअरमध्ये त्यासाठी ‘आॅप्शन’च नाही! त्यामुळे सरकार कोणत्या आधारावर हा लाभ देणार, ज्या लाभासाठी माहिती संकलित केली जात आहे, त्या कर्ज रकमेचाच उल्लेख होत नसल्याने अर्ज भरण्याचा हा ‘द्राविडी प्राणायम’ कशासाठी असा प्रश्न आहे.आॅनलाइन पद्धतीने माहिती संकलित केल्यानंतर शेतकºयाला किती लाभ होईल व सरकारने किती लाभ द्यायचा आहे, यांचा कोणत्याही प्रकारे बोध तर होत नाहीच; परंतु गोंधळात भर मात्र पडत आहे. कर्जदाराची पत्नी शेतकरी नसेल किंवा कर्जदार नसेल तरी तिचीही वैयक्तिक माहिती घेतली जात आहे. यात सरकारचा हेतू काय आहे, ते कळत नाही.त्यासाठी शेतकºयांची होणारी ससेहोलपट, खर्च, गर्दीतला मनस्ताप, कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी द्यावा लागणारा वेळ, त्यामुळे शेतीकामात होणारा खोळंबा, त्यामुळे होणारे नुकसान यांची भरपाई सरकार कशा पद्धतीने करणार आहे? शेतकºयाला कर्ज व व्याजाची रक्कम न समजल्यामुळे तो कोणत्या प्रकारच्या लाभास पात्र होईल, याचा उलगडा त्यास होत नाही. आणि हे सर्व करून लाभ केव्हा मिळेल, हेही निश्चित नसल्याने शेतकरी मनातून साशंक आहे़