शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस डीलरशिपच्या नावाखाली साडेदहा लाखाला गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून उज्ज्वला गॅस एजन्सीची डीलरशिप देण्याच्या नावाखाली कालिदास विलास सूर्यवंशी (वय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून उज्ज्वला गॅस एजन्सीची डीलरशिप देण्याच्या नावाखाली कालिदास विलास सूर्यवंशी (वय ३३, रा. दहिगाव, ता. यावल) या तरुणाला १० लाख ३३ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या सुनीलकुमार सहानी ब्रह्मदेव ऊर्फ अनिलकुमार (वय ३८, रा. तेजपूर, बिहार) व कन्हैय्या कुमार सहानी राजेंदर सहानी (वय ४३, कोलकाता) या दोघांना सायबर पोलिसांनी पंजाबमधून अटक केली. शनिवारी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत आशितोष कुमार नाव सांगणाऱ्या व्यक्तीने कालिदास सूर्यवंशी यांना उज्ज्वला गॅस एजन्सीची डीलरशिप देतो असे सांगून खोटी कागदपत्रे तयार केली व ती एका वेबसाइटवर पाठवून वेगवेगळ्या कारणांसाठी ए. यू. स्मॉल फायनान्स लि. या बँकेचा यूपीआय आयडीद्वारे बारकोड स्कॅन करून वेळोवेळी १० लाख ३३ हजार रुपये ऑनलाइन स्वीकारले होते. या व्यवहारानंतर ना डीलरशिप मिळाली ना पैसे. आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर सूर्यवंशी यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. त्यानुसार ६ जून २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता.

दिल्ली, पंजाब, कोलकाता फिरले पथक

सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे व उपनिरीक्षक अंगद नेमाणे यांनी या गुन्ह्यांचे तांत्रिक विश्लेषण करून अनिलकुमार याचे नाव निष्पन्न केले. अधिकच्या चौकशीत कन्हैय्याचेही नाव पुढे आले. त्यामुळे हवालदार वसंत बेलदार, प्रवीण वाघ, श्रीकांत चव्हाण, ललित नारखेडे व भालेराव यांचे पथक दिल्लीला रवाना झाले. तेथून हे पथक कोलकाता व नंतर पंजाबमध्ये फिरले. पठाणकोट येथून या दोघांना ताब्यात घेऊन शनिवारी सकाळी जळगावात दाखल झाले.

सीबीआयने केली होती अटक

जळगाव पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी या दोघांना दिल्ली सीबीआयने देखील फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये अटक केली होती. त्यानंतर पंजाबमधील पठाणकोट तसेच झाशी पोलिसांनी देखील यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी इतरांचाही सहभाग असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सुनीलकुमार हा यातील मास्टरमाइंड आहे. अनिलकुमार नावाने त्याने बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना गंडा घातला आहे. जळगाव पोलिसांना त्यांच्याकडे बँक खाते, केवायसी कागदपत्रे पुरावा म्हणून मिळून आला आहे. काही कागदपत्रे दिल्ली सीबीआयने पंचनामा करून ताब्यात घेतली आहेत.