शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

झुरखेड्याचे सुनील चौधरी झाले केंद्रीय अर्थमंत्रालयात उपसचिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 19:31 IST

आहे शेतकरीपुत्र : जि. प. शाळेत घेतलेय शिक्षण

धरणगाव : तालुक्यातील झुरखेडा येथील शेतकरीपूत्र सुनील भागवत चौधरी यांची केंद्रीय अर्थमंत्रालयात उपसचिव पदी नियुक्ती झाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेवून केंद्रीय अर्थ मंत्रालयात उपसचिव पदी नियुक्त झालेल्या ग्रामीण भागातील या युवकाच्या माध्यमातून तालुक्याचा सन्मान वाढला आहे.झुरखेडा ता.धरणगाव येथील प्रगतीशील शेतकरी भागवत छन्नू चौधरी व कोकीळाबाई यांचे पुत्र सुनील भागवत चौधरी यांची शैक्षणिक वाटचाल एका लहान खेडेगावातून झाली. त्याचे प्राथमिक -माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण जळगाव येथे झाले. त्यांनी सन २००८ साली युपीएससीची उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांची नियुक्ती नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात करण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल म्हणून नुकतीच १ जून रोजी सुनिल चौधरी यांना उप सचिव,आर्थिक कार्य विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे.गावाशी बांधीलकी कायमसुनील चौधरी यांनी दिल्ली येथे राहूनही गावाशी आपली बांधीलकी कायम ठेवलेली आहे. गावाच्या सामाजिक कार्यातही त्यांचे मार्गदर्शन व मदत मिळत असते, असे त्यांचे मित्र सुरेश पाटील यांनी सांगितले. तर ग्रामीण भागातील युवकांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यश हमखास मिळते. आई-वडिलांच्या आशीवार्दाने मी या पदापर्यंत पोहचल्याचे सुनील चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.