शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बिअरबारचे अनधिकृत बांधकाम तोडले

By admin | Updated: January 14, 2017 00:42 IST

शास्त्रीनगरात मनपाची कारवाई : जिल्हाधिकारी म्हणतात एकावरच कारवाई का?

जळगाव : रामानंदनगर रस्त्यावरील शास्त्रीनगरात रहिवासी भागात सुरू झालेल्या बिअरबार विरोधात नगरसेविकेने केलेल्या तक्रारीवरून मनपा अतिक्रमण विभागाने या हॉटेलचे मार्जीनस्पेसमधील शेडचे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई शुक्रवारी दुपारी केली. दरम्यान या हॉटेल मालक दाम्पत्याने जिल्हाधिका:यांकडे याआधीच याबाबत तक्रार केल्याने जिल्हाधिका:यांनी मनपा आयुक्तांना याच रस्त्यावर व परिसरात अन्य नागरिकांचेही अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण असताना त्यांच्यावर कारवाई का करीत नाही अशी विचारणा केली आहे. त्यामुळे आयुक्तांनी या परिसरातील सर्व अतिक्रमण अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. रामानंदनगर रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांच्या बाजूच्या गल्लीतच शास्त्रीनगरात गट नं.105, प्लॉट नं. 28 येथील घरात रविंद्र जगताप व नयना जगताप या दाम्पत्याने वर्षभरापूर्वी हॉटेल सनराईझ नावाने बिअरबार सुरू केला आहे. रहिवासी क्षेत्रातही सर्व अटी-शर्ती पूर्ण करून हा बिअरबार सुरू करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. दरम्यान या बिअरबारबाबत मात्र नागरिकांच्या वाढत्या तक्रारी असून या परिसरातील नगरसेविका उज्‍जवला बेंडाळे यांनी या बिअरबार विरोधात मनपाकडे तक्रार केली आहे. तसेच बुधवारी सह्यांची मोहीमही राबविली. मनपा आयुक्तांनीही या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाची पाहणी केली होती. नगररचना विभागाच्या अधिका:यांनी मोजणी करून  या हॉटेलचे अनधिकृत बांधकामाचे मोजमाप करून ते काढण्याची कारवाई अतिक्रमण विभागाच्या कर्मचा:यांच्या सहाय्याने शुक्रवारी सुरू केली. अतिक्रमण अधीक्षक एच.एम. खान यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचा:यांनी ते शेडचे अनधिकृत बांधकाम तोडले. यावेळी जागा मालक जगताप व मनपा कर्मचा:यांमध्ये बाचाबाचीही झाली. जिल्हाधिका:यांकडून विचारणा कारवाईबाबत नोटीस मिळताच 9 रोजीच जगताप दाम्पत्याने जिल्हाधिका:यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. त्यात नगरसेविका बेंडाळे व त्यांच्या पतीकडून विनाकारण त्रास दिला जात असल्याची तसेच अन्य नागरिकांचेही अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम असताना मनपा अधिका:यांना हाताशी धरून त्यांनाच त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. त्याची तातडीने दखल घेत जिल्हाधिका:यांनी मनपा आयुक्तांना याबाबत विचारणा केली होती. तसेच जगताप दाम्पत्याने दिलेल्या निवेदनावर जिल्हाधिका:यांनी आयुक्तांना नियमानुसार सर्वाचे अतिक्रमण काढा, फक्त यांचेच अतिक्रमण कसे काढता? असा शेराही मारला. 18 अतिक्रमणांची यादी तयारजिल्हाधिका:यांनी विचारणा केल्याने आयुक्तांनी तातडीने याबाबत आदेश दिले. त्यानुसार मनपाच्या अतिक्रमण विभागाचे अधीक्षक खान व नगररचना विभागाचे अभियंता समीर बोरोले यांनी या परिसरात सव्र्हे करून 18 अतिक्रमणांची यादीच तयार केली. त्यात गिरणा टाकी रोडवरील अनुभुती ऑटो, अंबर मेडिकल्स, सावलिया स्विट मार्ट, गणेश डेअरी,  पंकज इलेक्ट्रीकल्स, स्वप्नदीप मेडिकल, तुळजाई इलेक्ट्रीकल्स, ओमसाई सूरज हेअर आर्ट, जोशी फ्रुट सेंटर, परमानंद भरित सेंटर, शास्त्री नगर प्लॉट नं.81 मधील  लक्ष्मी ट्रेडर्स, तसेच जुने भगवान नगरातील प्लॉट नं.9मधील दुकान, पोस्टल कॉलनी प्लॉट नं. 10 व 20 मधील दुकान,भगवान नगरातील प्लॉट नं.58 मधील सत्यम प्रोव्हीजन, प्लॉट नं.40 मधील ओंकार निवास येथील दुकान, पोस्टल कॉलनी प्लॉट नं.2 मधील 2 दुकाने, लक्ष्मी वेल्डींग वर्क्‍स या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.  त्यांच्यावरही तातडीने कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.