भुसावळ, जि.जळगाव : येथील खडका रोड भागातील एक्सेल हॉस्पिटलतर्फे रजा टॉवर व अमरदीप टॉकीज चौकात २३ रोजी शहर व परिसरातील शेकडो नागरिकांना कोरोना संसर्गापासून बचावासाठी मालेगाव पॅटर्न काढा तयार करून मोफत वाटण्यात आला. सुमारे चारशेवर नागरिकांनी याचा लाभ घेतला.या युनानी काढ्याने खोकला, सर्दी व अन्य आजारावर नियंत्रण मिळवता येते, असे डॉ.एजाजखान यांनी सांगितले.यावेळी युनूस मामा शेख, मुजाहीद शेख, नदीम अरब, अशरफ तडवी, निसार खान, अकबर गवली, नजर शेख, कलीम शेख उपस्थित होते.
भुसावळात नागरिकांना युनानी काढा मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 14:54 IST