शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

उमविचा राहुरी, जोधपूर विद्यापीठांवर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:34 IST

यजमान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुरुष संघाने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३-१ ने पराभव केला

ठळक मुद्दे पश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धाप्रणव पाटील, दिलीप शिरसाठ, शुभम पाटीलच्या दमदार खेळीच्या जोरावर संघा मुख्य पात्रता फेरीत

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेच्या  तिसºया दिवशी गुरुवारी सायंकाळी यजमान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुरुष संघाने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३-१ ने पराभव केला. त्याचसोबत उमविच्या संघाने जोधपूरच्या विद्यापीठावर ३-२ विजय मिळवत मुख्य पात्रता फेरीत प्रवेश केला आहे. उमविच्या संघाने तिन्ही एकेरी सामन्यात दमदार विजय मिळवला, तर दुहेरीत चुरशीच्या सामन्यात उमविला राहुरी कृषी विद्यापीठाकडून पराभव पत्करावा लागला. पहिल्या एकेरीत प्रणव पाटील याने राहुरीच्या अक्षय साहसे याला २१-१०, २१-५ असे पराभूत केले. तर दिलीप शिरसाठ याने लोकेश जगताप याला २१-१२, २१-५ असे पराभूत केले. दुहेरीत दीपेश पाटील आणि गोपाल पाटील या जोडीने अक्षय साहसे आणि भूषण तिवाथने यांनी चुरशीच्या सामन्यात २१-१२, १६-२१, २६-२८ असा पराभव पत्करला. पहिल्या गेममध्ये उमविच्या संघाने आघाडी घेतली. मात्र त्यानंतर राहुरीच्या खेळाडूंनी आघाडी घेत दुसरा गेम जिंकला. निर्णायक गेममध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूंची दमछाक झाली. एक वेळ आघाडीवर असणाºया उमविच्या संघाला अखेरचे गुण मिळवता आले नाही. २१-२० अशा स्थितीतून राहुरीच्या खेळाडूंनी २८-२६ असा गेम संपवत विजय मिळवला.तिसºया लढतीत शुभम पाटील याने भूषण तिवाथने याला २२-२०, २१-६ असे पराभूत केले. भूषण याने शुभम याला पहिल्या गेममध्ये चांगलेच जेरीस आणले. मात्र दुसºया गेममध्ये जळगावच्या खेळाडूने राहुरीच्या खेळाडूवर वर्चस्व गाजवले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने आर.जी.तंत्रज्ञान विद्यापीठ, भोपाळला २-१ ने पराभूत केले. भूपाल नोबेल्स विद्यापीठाला  एकतर्फी विजय प्राप्त केला. त्यांनी सोलापूर विद्यापीठाला २-० ने पराभूत केले. मुंबई विद्यापीठाने एम.आय.टी. विद्यापीठाला २-० ने नमविले, तर सरदार पटेल विद्यापीठ, वल्लभ विद्यानगर आणि कादीसर्व विद्यापीठ, गांधीनगर यांच्यातील लढत तुल्यबळ झाली. गांधीनगरला २-१ ने पराभूत व्हावे लागले.गुरुवार सायंकाळपर्यंत पुरुष सामन्यांच्या झालेल्या स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे - बरकतुल्लाह विद्यापीठ, भोपाळ विजयी विरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ३-१,  देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर वि.वि मोहनलाल सुखदिया विद्यापीठ, उदयपूर, ३-० ने महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा  वि.वि. वीर नर्मदा साऊथ गुजरात विद्यापीठ, सुरत ३-२,  मुंबई विद्यापीठ मुंबई वि.वि. एल.एन. शारीरिक शिक्षणशास्त्र विद्यापीठ, ग्वाल्हेर ३-१, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर वि.वि. राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर यांच्यात झालेल्या सामन्यात सोलापूर संघाने ३-१ ने विजय मिळवला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे वि.वि. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

अमरावती ३-०.महिलांच्या सामन्यात एल.एन. शारीरिक शिक्षणशास्त्र विद्यापीठ, ग्वाल्हेर वि.वि. जागरण लेक सिटी विद्यापीठ, भोपाळ २-०.वीर नर्मदा साऊथ गुजरात विद्यापीठ वि.वि. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती २-०,राणी दुर्गावती विद्यापीठ, जबलपूर विद्यापीठ वि.वि. महाराजा गंगासिंग विद्यापीठ बिकानेर २-०.बुधवारच्या सामन्यात पुरुषांमध्ये पुणे विद्यापीठाचा खेळाडू ऋषभ देशपांडे तर महिलांमध्ये भूपाल नोबेल्स विद्यापीठ, उदयपूरची मेघा रावत हे त्या दिवसाचे उत्कृष्ट खेळाडू ठरले. या स्पर्धांसाठी प्रमुख पंच म्हणून प्रा.संजय सोनवणे, तर पंच म्हणून शेखर सोनवणे, नरेश गुंडेले, राहुल साळी, शुभम पुरी, मनीष पांडे, पूजा पाटील, जाई कापरेकर, भक्ती मुदाळे, वष्णवी मंगळूरकर, मयूर भावसार, परीक्षित पाटील, जागृती भामरे, अजिंक्य पाटील, पराग बागुल यांनी काम पाहिले.

उमवि महिला संघ पराभूत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ महिला संघाला आज पराभवाचा सामना करावा लागला. आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने २-० ने उमविचा पराभव केला. यात राधिनी भामरे हिला गायत्री मेहता हिच्याकडून २१-८, २१-१० असा पराभव पत्करावा लागला. तर स्वस्तिका बुटे हिने वृषाली ठाकरेला २१-७, २१-४ असे पराभूत केले. 

 

 

टॅग्स :Sportsक्रीडाBadmintonBadminton