शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला रंगली ‘उमंग साम्राज्ञी’ स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 15:51 IST

मनीषा बोरसे ठरल्या ‘साम्राज्ञी’ : महिलांनी केले कलागुणांचे सादरीकरण

चाळीसगाव, जि.जळगाव : विविध कलागुणांचे सादरीकरण करुन मनीषा बोरसे यांनी ‘उमंग साम्राज्ञी’ हा सन्मान पटकाविला. स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध कलागुणांचे सादरीकरण पाहून परीक्षकांनी ही निवड जाहीर केली.वेळी उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा संपदा उन्मेष पाटील यांच्यासह पं.स.सभापती स्मितल बोरसे, अध्यक्षा सुवर्णा राजपूत, सचिव नीता पाटील, समन्वयिका विजया पाटील, रेखा, मोहिनी लोहार, दिव्यांग महिला परिवाराच्या प्रमुख मीनाक्षी निकम, नाट्यकर्मी सुनीता घाटे, मेघा बक्षी, स्मितल बोरसे, डॉ. मीनाक्षी करंबळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या वतीने यंदा प्रथमच ‘उमंग साम्राज्ञी २०१८’ ही स्पर्धा राबविण्यात आली. यात उत्स्फूर्तपणे महिलांनी आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडविले. स्पर्धेत प्रथम फेरीत स्व ओळख यांची झाली. दुसऱ्या फेरीत कला सादरीकरण केले. तिसरी फेरीत आत्मविश्वासपूर्ण चालणे तर चौथ्या व पाचव्या फेरीत कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक योगदान सामान्य ज्ञान या गुणांवर आधारित प्रश्नोत्तर फेरी झाली.उमंग सम्राज्ञी प्रथम फेरीत सहभागी स्पर्धकांनी स्वताचा परिचय विविध प्रकारे केला काही स्पर्धकांनी उखाणे, कविता, चारोळी, गाण्याच्या प्रकारात केला. दुसरी फेरीत स्पर्धकांनी विविध कला सादर केल्या योगिता खैरनार यांनी घुमर नृत्य सादर केले. डॉ.नीता निकुंभ यांनी गाणे, वर्षा अहिरराव नृत्य, शैला राजपूत यांनी देशभक्तीपर गाणे म्हटले. रूचा अमृतकर यांनी नाट्यछटा सादर केली. हर्षा जैन यांनी चित्रकलेच्या मध्यम सादर केली. साधना निकम यांनी कौटुंबिक संवाद नाट्यछटा, मनीषा मालपुरे भारुड, प्रमिला जोशी भजन, पूजा जोशी चित्रकला, वर्षा अग्रवाल डान्स, नीलिमा सैतवाल डान्स, सुनीता बोरा नाट्य छटा, योगिता बंग नाट्य छटा, मनीषा बोरसे एकांकिका, योजना पाटील डान्स, अर्चना चौधरी गाणे, शैलेजा पाटील गवळण, डॉ. रुपाली निकुंभ लावणी, उषा राजपूत भजन, माधुरी बोरसे गवळण अशा विविध प्रकारे कला सादर केल्या.चौथ्या फेरीत १० स्पर्धकांना कमीत कमी वेळात प्रश्नाचे उत्तर देईल यातून पाचव्या फेरीला सात स्पर्धकांची निवड झाली. यातून ‘उमंग चाळीसगाव सम्राज्ञी २०१८ फर्स्ट रनर अप’ मनीषा बोरसे यांची निवड झाली. त्यांचा महाराष्ट्राची ओळख पैठणी व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.परीक्षक म्हणून मीनाक्षी निकम, मेघा बक्षी, सुनीता घाटे, सुवर्णा राजपूत, नीता चव्हाण यांनी काम पाहिले. सेकंड रनरअप योगिता बंग यांना पैठणी व सन्मान चिन्ह देण्यात आले. थर्ड रनरअप डॉ. रुपाली निकुंभ यांना पैठणी व सन्मान चिन्ह देण्यात आले.मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नीता चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सChalisgaonचाळीसगाव