शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वला गॅस योजना या महिन्यापासून होणार पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र सरकारने राबविलेले प्रधानमंत्री उज्ज्‍वला गॅस योजना पावणे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा सुरू होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र सरकारने राबविलेले प्रधानमंत्री उज्ज्‍वला गॅस योजना पावणे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा सुरू होत आहे. या योजनेसाठी अर्ज भरणे सुरू झाले असून जिल्ह्यातील जवळपास इच्छुक लाभार्थ्यांना याचा लाभ होऊ शकणार आहे.

दारिद्रय रेषेखालील महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस उपलब्ध करुन देत पांरपारिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे डोळ्यांवर व शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजना सुरू केली होती. जिल्ह्यात १ मे २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत ही योजना राबविली गेली. याअंतर्गत जिल्ह्यातील लाखो महिलांना मोफत कनेक्शन देण्यात आले. १ ऑक्टोबर २०१९ पासून ही योजना बंद झाली. त्यानंतर आता केंद्र सरकार देशभरात ही योजना पुन्हा सुरु करीत असून जिल्ह्यातील महिलांना याचा लाभ होणार आहे.

यासाठी इच्छुक लाभार्थ्यांना आपल्या परिसरात असलेल्या गॅस एजन्सी ठिकाणी अर्ज करून द्यायचा आहे.

योजनेसाठी निकष

अर्ज सादर करताना अर्जदाराला आपले संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर, जन-धन बँक खात्याचे नंबर देणे बंधनकारक राहणार आहे. सोबतच बीपीएल प्रमाणपत्र, बीपीएल रेशन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करताना अर्जदार वयाची १८ वर्षे पूर्ण केलेला असावा.