शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर येथील दोघे तरुण अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 16:00 IST

एक गंभीर : जळगाव चोंडी गावाजवळील दुर्घटना

अमळनेर : शिर्डीहून मोटरसायकलने परतताना ट्रकने धडक दिल्याने शहरातील झामी चौक व बालाजीपुरा भागातील तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना १५ रोजी पहाटे १ वाजता मालेगाव - पुणे रोडवर जळगाव चोंडी गावाजवळ घडली. या अपघातात अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत गावात हळहळ व्यक्त होत आहे.झामी चौकातील विकास जगन्नाथ ईशी (वय २९) व, बालाजी पुरा भागातील साईबाबा मंदिराजवळील गणेश चौधरी (वय ३२) तसेच प्रीतम गुलाब ठाकूर (वय ३०) , चंद्रकांत पाटील हे चार जण १४ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारस प्रीतमचा भाऊ हर्षल ठाकूर याला घ्यायला मोटरसायकलने शिर्डी जाण्यास निघाले. हर्षल मोटरसायकलने पुण्याला गेलेला होता. तो मोटरसायकलने शिर्डी पर्यंत आला होता. रात्री शिर्डीहून परतताना विकासला गाडी चालवता येत नव्हती. म्हणून प्रीतमने गाडी चालवायला घेतली व गणेश त्याला मागून धरून बसला. तिघे एकाच मोटरसायकलने परत यायला निघाले होत.े तर चंद्रकांत आणि हर्षल दोन्ही वेगवेगळ्या मोटरसायकलने पुढे निघाले होते. मालेगाव जवळील जळगाव चोंडी गावाजवळ एका ट्रकने धडक दिल्याने एकाच मोटरसायकलवर असलेले विकास , गणेश , प्रीतम खाली कोसळले त्यात विकास जागीच ठार झाला . गणेश व प्रीतमला मालेगाव ला खाजगी दवाखाण्यात दाखल केले असता गणेशचा देखील मृत्यू झाला. प्रीतम गंभीर जखमी आहे. त्याचा पाय फ्रँक्चर झाला आहे.