शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकास गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना तीन वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:56 IST

चोपडा तालुक्यातील मितावली येथील जुन्या उसनवारी पैसे देण्याघेण्याच्या वादातून एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी चोपडा न्यायालयाने दोघांना दोषी धरत तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ठळक मुद्दे्रजुन्या उसनवारीच्या पैशावरून झाला होता वादचोपडा न्यायालयाचा निकाल

चोपडा : तालुक्यातील मितावली येथील जुन्या उसनवारी पैसे देण्याघेण्याच्या वादातून एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी चोपडा न्यायालयाने दोघांना दोषी धरत तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.न्यायालयीन सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, १० जानेवारी १७ रोजी अरविंद अशोक पाटील रा. मितावली हा अडावद बस स्थानकावर जात असतांना योगीराज गोरख पाटील व दुर्गादास बद्रीनाथ पाटील यांना उसनवार दिलेले पैसे मागितले असता त्याचा राग आल्याने दोघांनी अरविंद याच्या डोक्यात लोखंडी पट्टी मारून गंभीर जखमी केले. याबाबत अडावद पोलीस स्टेशनला अरविंदचे वडील अशोक नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.याचा तपास रवींद्र सोनार यांनी करून दोघा आरोपींवर दोषारोप पत्र चोपडा न्यायालयात दाखल केले होेते. न्यायालयाने सहा साक्षीदार तपासून त्यांची साक्ष ग्राह्य धरीत न्या. ग. दि. लांडबले यांनी दोघा आरोपींना दोषी धरीत भादंवि कलम ३२६ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून बी. जी. खिल्लारे यांनी काम पाहिले. पो.कॉ. रमेश माळी यांनी त्यांना मदत केली.