रावेरमध्ये चाकूचा धाक दाखवत दोन महिलांचे दागिने लांबविले
By admin | Updated: July 15, 2017 13:23 IST
मध्यरात्री चाकूचा धाक दाखवून दोन महिलांचे दागिने तसेच रोख रक्कम अज्ञात चोरटय़ांनी लांबविली
रावेरमध्ये चाकूचा धाक दाखवत दोन महिलांचे दागिने लांबविले
ऑनलाईन लोकमतरावेर, जि. जळगाव, दि. 15 - रावेर शहरात शुक्रवारी मध्यरात्री चाकूचा धाक दाखवून दोन महिलांचे दागिने तसेच रोख रक्कम अज्ञात चोरटय़ांनी लांबविली. माऊलीनगरमध्ये यमुनाबाई निवृत्ती पाटील यांच्या घरी रात्री मंगलाबाई महेंद्र रायपूरकर या झोपण्यासाठी आल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरटय़ांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व मंगलाबाई यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्य़ातील सोनपोत, कर्णफुले व चापे असे एकूण 18 ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविले. या शिवाय विश्मकर्मा कॉलनीमध्ये राजेंद्र आत्माराम चौधरी यांच्याही घराचा दरवाजा तोडून चोरटय़ांनी तेथेही चाकूचा धाक दाखवत राजेंद्र यांच्या पत्नीच्या अंगावरील 15 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख 30 हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी अज्ञात चोरटय़ाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.