शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 12:37 IST

जळगाव : मुक्ताईनगर येथून काम आटोपून घरी परतत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार संदीप शांताराम चांदेलकर (३५,रा़ रामेश्वर कॉलनी) ...

जळगाव : मुक्ताईनगर येथून काम आटोपून घरी परतत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार संदीप शांताराम चांदेलकर (३५,रा़ रामेश्वर कॉलनी) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास महामार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळ घडली़ सुदैवाने दुचाकीवर मागे बसलेला मित्र रवींद्र शांताराम कोळी (रा़ रामेश्वर कॉलनी) किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे़संदीप चांदेलकर हा कुटूंबियांसह रामेश्वर कॉलनीत वास्तव्यात होता़ घरा शेजारीच मित्र रवींद्र हा राहतो. दोघे जण मार्बलचे कारागिर असल्यामुळे दोन्ही सोबतच काम करायचे़ शुक्रवारी मुक्ताईनगर येथील काम मिळाल्याने दोघेही दुचाकीने मुक्ताईनगर गेले होते़ रात्री काम आटोपल्यानंतर दोघे दुचाकीने परतीच्या मार्गावर निघाले़ दरम्यान, रात्री ९ वाजेच्या सुमारास महामार्गाजवळील दूरदर्शन टॉवरजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ यामध्ये संदीप याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर रवींद्र हा किरकोळ जखमी झाला़कुटूंबियांचा प्रचंड आक्रोशसंदीप याचा मृत्यू झाल्याची बातमी कुटूंबियांना कळताच त्यांनी प्रंचड आक्रोश केला़ जिल्हा रूग्णालयात आई तसेच पत्नी यांनी हंबरडा फोडला़मृतदेह जागेवर पडूनअपघातानंतर मृतदेह तब्बल पाऊण ते एक तास महामार्गावरच पडून होता़ त्यामुळे महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती़ अखेर एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला जिल्हा रूग्णालयात नेला़ यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संदीप यास मृत घोषित केले़

टॅग्स :Jalgaonजळगाव