शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रॅक्टर कचऱ्यांची लावली विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:29 IST

जळगाव : जनता कर्फ्यूदरम्यान सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याने या काळात दाणाबाजार असोसिएशनच्यावतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये ...

जळगाव : जनता कर्फ्यूदरम्यान सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याने या काळात दाणाबाजार असोसिएशनच्यावतीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये पहिल्या दिवशी दोन ट्रॅक्टर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

किराणा दुकानांसह सर्वच दुकाने बंद ठे‌वली जाणार असल्याने या बंदच्या काळात बाजारपेठेत साफसफाई करण्याचा निर्णय दाणाबाजार असोसिएशनने घेतला. त्यानुसार पहिल्या दिवशी दाणाबाजारातील मुख्य रस्ता व या मार्गावर असलेल्या दुकानांसमोर साफसफाई करण्यात आली.

मनपाच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत मनपा कर्मचाऱ्यांनी सकाळी सात वाजता साफसफाईला सुरुवात केली. दुपारपर्यंत संपूर्ण परिसर स्वच्छ करीत दोन ट्रॅक्टर कचरा गोळा केला. १३ व १४ रोजीदेखील ही मोहीम राबविली जाणार आहे.

यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया, राधेश्याम तिवारी, लक्ष्मीकांत वाणी यांच्यासह इतरही व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत साफसफाईला हातभार लावला.