शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

उंबरखेडला शिंदीची दोन हजार झाडे आगीत जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 15:29 IST

अज्ञाताकडून घाला : केरसुणी तयार करणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

उंबरखेड, ता.चाळीसगाव : केरसुण्या बनवून उदरनिर्वाह करणारी मातंग समाजाची येथे पंधरा-वीस कुटुंब आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवरच कोण्या अज्ञाताने घाला घातला व शिंदी वृक्षाची दोन हजार झाडे जाळून टाकली. या समाजाच्या उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची व रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील मातंग समाजातील कुटुंबांचा पिढीजात केरसुण्या बनवून, त्या विकून त्यावर उदरनिर्वाह करण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. त्यामुळे या कुटुंबाने उंबरखेडे व दड पिंपरी शिवारातील कोरडी नाल्या काठावरील आपल्या शेतात व बांधावर चार-पाच हजार शिंदीची झाडे लावलेली आहेत. त्या झाडांचे फडे काढून केरसुण्या बनवतात व गावोगावी जाऊन विकून पैसे मिळतात.२४ मे रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने या झाडांना आग लावून जाळल्याची घटना घडली आहे. या शेतात शेजारील शेतकरी साहेबराव कुंभार यांनी झाडे जळत असल्याचे संबंधितांना कळवले.शिंदीची झाडे जळत असल्याचे समजताच एकनाथ महादेव शिरसाट, शरद रमेश शिरसाट, बंटी शिरसाट, विकी अहिरे, राकेश धनराज शिरसाट, प्रवीण त्रिभुवन, छोटू उखाजी शिरसाट आणि प्रत्यक्षदर्शी साहेबराव कुंभार यांनी जळत असलेली झाडे विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुपारचे कडक ऊन व वारा यामुळे आग पसरत गेली व दोन ते तीन हजार झाडे जळून खाक झाली आहेत.त्यांच्या पोटापाण्याचे साधनच नाहीसे झाल्याने सर्व कुटुंब आजच उघड्यावर पडली आहेत.भाऊराव पंडित शिरसाट, महादू विठ्ठल शिरसाट, रमेश बंकट शिरसाट, उखाजी दामू शिरसाट, गोवा जी अप्पा शिरसाट यांच्या मालकीची ही सर्व झाडे होती.कच्चा माल मिळण्यास अडचणीशिंदी वृक्षाची झाडे जळाली.त्यामुळे शिंदीच्या झाडापासून केरसुणी तयार करणाºया कुटुंबांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. पुढील अनेक वर्षांचा व्यवसायासाठी लागणारा कच्चा मालच मिळणार नसल्याने त्यांची उपासमार ठरलेली आहे. महसूल प्रशासनाने पंचनामा करून संबंधित कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी या कुटुंबाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदीच्या झाडांना आग लावणाºया अज्ञाताचा शोध घेवून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी समाज बांधवांकडून करण्यात आली आहे.