शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या दोन जागांचा युतीपुढे पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 11:02 IST

जळगाव, भुसावळ मतदार संघ सेनेचे, पण विद्यमान आमदार भाजपाचे

ठळक मुद्देशिवसेनेचा दोन्ही ठिकाणी प्रभाव

जळगाव : भाजपा- शिवसेनेत युती होऊन कोणी किती जागा लढवायच्या यावर शिक्कामोर्तब झाले, मात्र जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ पैकी दोन जागांवरून पुन्हा ठिणगी पडण्याचेच संकेत आहेत. जळगाव, भुसावळ विधानसभा मतदार संघ हे पूर्वीच्या समिकरणानुसार शिवसेनेकडे होते, मात्र या मतदार संघातील विद्यमान आमदार हे भाजपाचे आहेत.लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत युती होणार नाही, असे म्हटले जात असताना सोमवारी युतीची घोषणा झाली. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या हे देखील ठरले. त्यानंतर आता विधानसभा मतदार संघाचे नियोजन सुरू झाले आहे. दोन्ही पक्षांकडून आडाखे बांधले जात आहे. त्यामुळे पूर्वी शिवसेनेच्या वाटेचे दोन मतदार संघावर या पक्षाने दावा केल्यास या दोन मतदार संघांवरून पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यात शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या जळगाव शहर व भुसावळ विधानसभा मतदार संघात भाजपाचे आमदार निवडून आले होते. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे चाळीसगावमधून उन्मेष पाटील, जामनेरमधून विद्यमान मंत्री गिरीश महाजन, मुक्ताईनगरमधून माजी मंत्री एकनाथराव खडसे, यावल-रावेरमधून हरिभाऊ जावळे, भुसावळ माजी मंत्री संजय सावकारे, जळगाव शहर सुरेश भोळे हे सहा जण विजयी झाले होते. एरंडोल मधून जि.प.चे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी एरंडोल - पारोळा विधानसभा मतदार संघातून लढत दिली होती. शिवसेनेला २०१४ च्या निवडणुकीत चोपड्यातून प्रा. चंद्रकांत सोनवणे, पाचोरा किशोर पाटील, जळगाव ग्रामीणमधून विद्यमान राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार संघ राखले होते.असा होता २००९ चा फॉर्मूलाविधानसभेच २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा शिवसेनेत युती होती. यात शिवसेनेने सहा तर भाजपाने पाच जागा लढविल्या होत्या. शिवसेनेने जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल-पारोळा व चोपडा या सहा जागा लढविल्या होत्या. तर भाजपाच्या वाट्याला चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, यावल-रावेर, अमळनेर हे पाच विधानसभा मतदार संघ आले होते. २०१४ मध्ये मात्र भाजपा-सेनेची युती नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी प्रत्येक मतदार संघात उमेदवार दिला होता.शिवसेनेचा दोन्ही ठिकाणी प्रभाव४जळगाव शहर मतदार संघ व भुसावळ विधानसभा मतदार संघात प्रारंभापासून शिवसेनेचा प्रभाव असल्याचे लक्षात येते. २००९ मध्ये संजय सावकारे हे राष्टÑवादीच्या उमेदवारीवर विजयी झाले होते व २०१४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला व विजयी झाले होते. मात्र भुसावळ शहरात शिवसेनेचा प्रभाव चांगला राहीला आहे. या मतदार संघातून दोन वेळा सावकारे विजयी झाल्याने पक्ष या मतदार संघावरील दावा सहजासहजी सोडणार नाही. सावकारेंसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे हे प्रयत्नशिल रहातील.जळगाव सेनेचा पारंपरिक मतदार संघ४ शहर मतदार संघात २०१४ ची निवडणूक लढविता शिवसेनेचा प्रभाव राहीला आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन हे काही काळ शिवसेनेत नसले तरी तब्बल विधानसभेच्या नऊ निवडणुकांमध्ये त्यांनी हा मतदार संघ आपल्याकडे राखला आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाचे सुरेश भोळे हे विजयी झाले होते. मात्र पूर्वीपासून हा मतदार संघ शिवसेनेकडेच होता. शिवसेना आता या मतदार संघावरील दावा सोडणार नाही हे तेवढेच खरे. या मतदार संघातून पुन्हा माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी निवडणूक लढवावी असा या पक्षातील नेते मंडळींचा आग्रह सुरू आहे. त्यामुळे पारंपरिक मतदार संघ पुन्हा आपल्याकडे यावा, यासाठी शिवसेना आग्रही राहिल्यास जळगाव व भुसावळ मतदार संघांवरून पेच निर्माण होण्याचेच संकेत आहेत.

टॅग्स :Politicsराजकारण