शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथे संशयावरुन वाद, ‘एलसीबी’त दोन पोलीस कर्मचा-यांमध्ये ‘फ्री-स्टाईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 13:02 IST

आठवडाभरात ‘खाकी’चा दुस-यांदा धिंगाणा

ठळक मुद्देबीट व आर्थिक व्यवहार वादास कारणीभूतहाणामारीची पोलीस दलात जोरदार चर्चा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 21 -22 स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कार्यालयात सोमवारी सकाळी 11.30 वाजता दिलीप येवले व ईश्वर सोनवणे या दोन पोलीस कर्मचा:यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बीट बदल केल्याच्या कारणावरुन दोन वर्षापासून या कर्मचा:यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु होती, ती सोमवारी हाणामारीच्या माध्यमातून उफाळून आली. या हाणामारीची पोलीस दलात जोरदार चर्चा आहे. पाच दिवसांपूर्वी शिघ्र कृती दलातील कर्मचा:यांनी दारु पिऊन जिल्हा क्रीडा संकुलात धिंगाणा घातला होता. या घटनेची पोलीस दलात चर्चा सुरु असताना आज पुन्हा एकदा दोन कर्मचा:यांनी चक्क पोलीस मुख्यालयाचत हाणामारी केल्याने पोलीस दलाची नाचक्की झाली आहे. काय आहे नेमका वाद?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या कार्यकाळापासून स्थानिक गुन्हे शाखेत कर्मचा:यांमध्ये दोन गट पडले आहेत. हे दोन्ही गट एकमेकाचे कट्टर विरोधक म्हणून आजही वावरत आहेत.  तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी 13 कर्मचा:यांना ‘एलसीबी’मधून बाहेर काढले होते. राजेशसिंह चंदेल यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेचे सूत्रे आल्यानंतर ईश्वर सोनवणे या कर्मचा:याचे बीट बदल करण्यात आले. दिलीप येवले यांच्या सांगण्यावरुनच हे बीट बदल झाल्याचा गैरसमज झाल्यामुळे सोनवणे व येवले यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. दरम्यान, याप्रकरणी या दोघांचे व प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदविण्यात आले. अन् ठिणगी पडलीसोमवारी सकाळी दिलीप येवले व ईश्वर सोनवणे हे हजेरी मास्तरच्या खोलीत असताना धक्का लागल्याच्या कारणावरुन शाब्दीक वाद होऊन त्यांच्यात हाणामारी झाली. यात कर्मचा:याचे कपडेही फाटले. शेजारीच पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांचे कार्यालय व त्यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी पाहता कर्मचा:यांनी हा वाद सोडविला. त्यानंतर दोन्ही कर्मचारी वेगळे झाले. मुख्य सूत्रधार पडद्याआड.. येवले व सोनवणे यांच्यात झालेल्या हाणामारीत मुख्य सूत्रधार वेगळाच असल्याची चर्चा कर्मचा:यांमध्ये होती. हा सूत्रधार सोनवणे यांना भेटल्यानंतर पुन्हा  या दोघांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलीस दलाची नाचक्की

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, बीट व आर्थिक व्यवहार हे दोनच मुख्य कारणे या दोन्ही कर्मचा:यांच्या वादामागे आहेत. हाणामारी झाले तेव्हा कार्यालयात एकही अधिकारी नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे हे तरसोद फाटय़ाजवळील एटीएम फुटल्याने तपासाचे नियोजन करण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या दालनात होते. त्यानंतर कराळे व कुराडे हे घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यामुळे या हाणामारीची सायंकाळर्पयत त्यांना माहिती नव्हती, अशी माहिती मिळाली. सायंकाळर्पयत संपूर्ण शहरात या घटनेची माहिती वा:यासारखी पसरली होती.15 नोव्हेंबर रोजी  चार कर्मचा:यांनी दारु पिऊन मध्यरात्री जिल्हा क्रीडा संकूल परिसरात धिंगाणा घालून कुंडय़ा व बॅनर फाडल्याची घटना घडली होती. ज्या पोलिसांवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे तेच हाणामारी करतात, धिंगाणा घालतात..या प्रकारामुळे पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.