शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालयात एकाच खाटेवर दोन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:15 IST

हाल : रुग्णसंख्या वाढल्याने जागा अपूर्ण

ठळक मुद्देजागा कमी पडत असल्याने एकाच खाटेवर दोन-दोन रुग्णगेल्या महिनाभरापासून थंडी-तापाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ9 व 13 क्रमांकाच्या कक्षासह आपत्कालीन कक्षातही जागा कमी

ऑनलाईन लोकमत

 

जळगाव, दि. 9 - दिवसेंदिवस थंडी, तापाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे  येथील जागा कमी पडत असल्याने एकाच खाटेवर दोन-दोन रुग्ण टाकण्याची वेळ  आली आहे. गेल्या महिनाभरापासून थंडी-तापाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने खाजगी रुग्णालयात गर्दी  वाढलेली आहे. सोबतच जिल्हाभरातील रुग्ण जिल्हा रुग्णालयात येत असल्याने येथेही जागा कमी पडत आहे. थंडी-तापासह सर्पदंश, विषप्राशनच्या रुग्णांचीही संख्या वाढू लागल्याने 9 व 13 क्रमांकाच्या कक्षासह आपत्कालीन कक्षातही जागा कमी पडत आहे. पुरुषांचा 9 क्रमांकाचा व महिलांच्या 13 क्रमांकाचा कक्ष हा थंडी, ताप, सर्पदंश, विषप्राशनच्या रुग्णांसाठी आहे. हे रुग्ण वाढत असल्याने येथे जागा कमी पडत आहे. त्यामुळे एका खाटेवर दोन रुग्ण टाकावे लागावे लागत आहे. या सोबतच आलेल्या गंभीर रुग्णांना प्रथम आपत्कालीन कक्षात दाखल करावे लागते, त्यामुळे तेथेही जागा कमी पडते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी आलेल्या प्रत्येक रुग्णावर येथेच उपचार करण्यात यावे, एकही रुग्ण बाहेर जाता कामा नये, अशी तंबी दिल्याने रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातच उपचार केले जात असल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येणा:या रुग्णांची संख्या वाढत आहे. महिला रुग्णालयाचे काम झाल्यानंतर येथे जागा उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे या रुग्णालयाचे काम मार्गी लागण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. 

जिल्हा रुग्णालयात येणा:या व त्यांच्यावर उपचार करण्यात येणा:या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आहे त्या सोयी-सुविधेत रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. - डॉ.एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.