शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दोन किंवा तीन वेचणीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

सावध पवित्रा :बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी उचलले पाऊल जितेंद्र पाटील लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद: बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या सरासरी ...

सावध पवित्रा :बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी उचलले पाऊल

जितेंद्र पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद: बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या सरासरी उत्पादनात अलीकडील काही वर्षात झालेली घट लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपाला सामोरे जाताना सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीच्या दोन किंवा तीन वेचण्या झाल्यानंतर कपाशीचे पीक लगेच उपटून फेकण्याच्या इराद्यानेच जवळपास सर्व शेतकऱ्यांनी यंदा कपाशी लागवडीसाठी पाऊल उचलले आहे.

जळगाव जिल्ह्यात सरासरी सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पीक घेतले जाते. त्यापैकी साधारण २० टक्के क्षेत्रावरील कापसाचे पीक हे बागायती तर उर्वरित जिरायती असते. गेल्या काही वर्षात सततच्या प्रतिकूल हवामानामुळे कापसाचे उत्पादन घटलेले असतांना, खुल्या बाजारातही अपेक्षित भाव न मिळाल्याने कोरडवाहू व बागायती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे संकटात आणखी वाढ झाल्यानंतर कापसाची शेती तर अक्षरशः आतबट्ट्याची ठरली आहे. अशा या परिस्थितीत यंदा कपाशी लागवडीसाठी सरसावलेल्या शेतकऱ्यांनी थोडी सावध भूमिका घेतली असून, सुरुवातीच्या दोन-तीन वेचण्या झाल्यानंतर शेतातील कापसाचे पीक उपटून त्या जागी रब्बी हंगामात गहू, हरभरा किंवा मका पीक घेण्याचे नियोजन विशेषतः पूर्वहंगामी कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आतापासून करून ठेवले आहे. सुरुवातीच्या वेचण्या झाल्यानंतर नेमका बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कापसाचे पीक जोपासणे खूपच जिकिरीचे ठरते. कीड लागलेल्या कापसाचा दर्जा खराब झाल्याने बाजारात त्यास फार किंमत मिळत नाही. शिवाय कीड लागलेले बोंड वेचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मजुरीचा खर्चही आवाक्याबाहेर जातो. अतोनात मेहनत घेऊनही हाती काही पडत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला येतो. या सर्व गोष्टींचा विचार करता काही शेतकरी फरदड कापसाचे उत्पादन घेण्याऐवजी हिवाळ्यात त्या क्षेत्रात रब्बी पिके घेऊन दोन हंगाम घेण्यात यशस्वी ठरल्याचीही उदाहरणे आहेत.

-----------------

हाच पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या खरिपात बहुतेक सर्व शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीच्या जुन्या पद्धतीला मूठमाती देऊन बोंडअळीच्या प्रादुर्भावावर मात करण्याची नवी व्यूहरचना आतापासून आखल्याचे निदर्शनास आले आहे. कापसाच्या एकूण उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात चांगली सुधारणा होण्याचे संकेत त्यामुळे प्राप्त झाले आहेत.

-----------------

(कोट)...

गेल्या वर्षीच्या हंगामात १२ एकरावर कपाशीची लागवड केल्यानंतर बोंडअळीमुळे जेमतेम ९५ क्विंटल कापसाचे उत्पादन एकाच वेचणीतून मिळाले होते. सुदैवाने कापसाचे पीक उपटून रब्बीत गहू घेतल्याने नुकसान भरून निघाले. यंदाही पहिल्या दोन- तीन वेचण्या झाल्यानंतर जास्त लोभात न पडण्याचा निर्णय घेत १५ एकरावर पूर्वहंगामी कपाशी लागवड केली आहे.

- प्रशांत ढाके, शेतकरी, ममुराबाद

-------

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे होणारे सततचे नुकसान लक्षात घेता कापसाचे फरदड पीक घेण्याऐवजी नंतरच्या हंगामात गहू, हरभरा, संकरीत ज्वारी, मक्याचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे बोंडअळी आटोक्यात येणे शक्य झाले आहे.

- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव

-----------------

फोटो-

बोंडअळीच्या प्रादुर्भावावर मात करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात कपाशी लागवडीत सावध भूमिका घेतली आहे.