लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : आमदार सुरेश दामू भोळे यांचे मुंबई-अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेसमध्ये चार्जिंगला लावलेले एक लाख २० हजार रुपये किमतीचे दोन महागडे मोबाईल मंगळवारी चोरट्यांनी लांबविले.भुसावळ लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे दीड लाखाचे मोबाईल चोरीची घटना ताजी असताना हा चोरीचा प्रकार घडला. आमदार भोळे हे सोमवारी रात्री मुंबई येथून जळगावला येण्यासाठी निघाले. ए-१ या वातानुकुलित बोगीत सीट क्रमांक २५-२६ हे त्यांचे आरक्षित होते.
आमदार भोळे यांचे लाखाचे दोन मोबाईल लांबविले
By admin | Updated: July 5, 2017 04:16 IST