शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

दोनशे ट्रॅक्टर मोजणीच्या प्रतीक्षेत उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 00:15 IST

जामनेर: बारदान संपल्याने तूर खरेदी ठप्प, शेतकरी हतबल,

जामनेर : येथील बाजार समिती आवारात सुरू असलेल्या शासकीय  तूर खरेदी केंद्रावर बारदान       संपल्याने गुरुवार सकाळपासूनच खरेदी ठप्प झाली आहे. शासनाने तुरीसाठी हमी भाव जाहीर केल्यामुळे शेतकरी मोठय़ा प्रमाणात केंद्रावर तूर आणत आहेत. मात्र गेल्या आठवडय़ात ग्रेडर नसल्याने खरेदी बंद होती. ग्रेडर आल्यावर खरेदी सुरू झाली खरी; मात्र आता बारदान संपल्याने पुन्हा खरेदीत विघ्न निर्माण झाले असून नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.आतार्पयत सुमारे 1 हजार 500 क्विंटल तूर खरेदी झाली असून बाजार समिती आवारात तुरीने भरलेले सुमारे 200 ट्रॅक्टर मोजणीअभावी उभे आहेत. ट्रॅक्टरचे दररोजचे भाडे परवडत नसल्याने शेतक:यांनी तुरीचे पोत्यांचे उघडय़ावर ठेवले आहेत. राज्यातील काही भागाला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने व वातावरणातील बदल पाहून शेतकरीदेखील उघडय़ावरील तुरीमुळे चिंतेत आहे. व्यापा:यांकडून शेतक:याची तूर चार हजार ते चार हजार दोनशे या भावाने खरेदी केली जात असल्याने शेतकरी शासकीय केंद्रावर तूर विक्रीसाठी आणत आहे. नाफेडकडून खरेदी केलेल्या तुरीची रक्कम शेतक:यांच्या बँक खात्यात आरटीजीएसने जमा होत असून यासाठीसुद्धा दहा ते पंधरा दिवस लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.पुढा:यांबद्दल संतापदरम्यान, तूर उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून पंधरा   दिवसांपासून केंद्रावर थांबावे लागत आहे. केवळ निवडणुकीत मते मागायला येणा:या  राजकारण्यांविषयी शेतक:यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतक:यांच्या समस्यांवर रस्त्यांवर उतरून आंदोलन करणारे पुढारी आता गप्प कसे, असा सवाल विचारला जात आहे.गेल्या दहा दिवसांपासून तुरीचे ट्रॅक्टर केंद्रावर थांबून आहे. आज खरेदीसाठी नंबर लागला असतानाच बारदान संपल्याने खरेदी बंद झाली. शेतक:यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही.-उमेश जैन, शेतकरी, तळेगावबारा दिवसांपासून तूर विक्रीसाठी बाजार समितीच्या आवारात थांबून आहे. आजर्पयत नंबर लागला नाही. वातावरणात बदल होत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास तुरीच्या होणा:या नुकसानीला कोण जबाबदार राहील. मोजणीसाठी काटे वाढवावेत व बारदान लवकर उपलब्ध करून द्यावे.-शालिग्राम नारायण पाटील,शेतकरी, चिंचखेडे बुद्रूकगेल्या आठ दिवसांपासून तुरीचे ट्रॅक्टर घेऊन थांबलो आहे. संथगतीने मोजणी होत असल्याने व मध्येच व्यापा:यांची तूर वशिलेबाजीने मोजली जात असल्याने आमचा नंबर लागत नाही. शेतकरी संघाने याकडे लक्ष घालून शेतक:यांच्या समस्या                   सोडवाव्यात.-संजय सुरळकर,शेतकरी, फत्तेपूर लोणीतूर खरेदी नियमितपणे सुरू होती. मात्र डीएमओ कार्यालयाकडून बारदान पुरवठा होत नसल्याने खरेदी नाइलाजास्तव थांबवावी लागली. बारदान उपलब्ध करावे यासाठी यापूर्वीच त्यांचेकडे मागणी केली आहे. बारदान मिळताच खरेदी सुरू केली जाईल.-चंद्रकांत बाविस्कर,चेअरमन, शेतकरी सहकारी संघ