पाचोरा : तालुक्यात शुक्रवारी पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली. यामुळे नदी व नाल्यांना पूर आले. यादरम्यान कळमसरे शिवारातील पुराच्या पाण्यात बैलगाडीसह दोन जण वाहून गेले. यापैकी एकजण सुरक्षित बाहेर आला तर दुसरा बेपत्ता आहे. कळमसरे येथील लोंढी नाल्याला पुरात ही घटना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. सीताराम देवचंद वाघ (वय ६० ) व गजानन एकनाथ वाघ (वय ३५ ) हे दोघे रा. कळमसरे, ता. पाचोरा हे बैलगाडीने शेतातून येत असताना पुराचा अंदाज न आल्याने लोंढी नाल्याच्या पुरात बैलगाडीसह वाहून गेले. यावेळी सीताराम देवचंद वाघ हे एका झाडाच्या मुळीला लटकल्याने वाचले व सुखरूप बाहेर पडले.मात्र गजानन वाघ हा अद्याप बेपत्ता असून शोधकार्य सुरु आहे. त्यास पोहता येत नसल्याचे उपसरपंच कैलास चौधरी यांनी सांगितले. तर गाडीचे मागे बांधलेला गोºहादेखील वाहून गेला. या घटनेत बैलजोडी जिवंत सापडली तर गोºहा मृत झाला आहे.
कळमसरे शिवारातील पुरात दोघे गेले वाहून, एक बचावला तर एक बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:59 IST